कामाच्या दर्जा बाबत अजिबात तडजोड नाही; सांगली च्या नूतन झेड पी सीईओ तृप्ती धोडमिसे

0
44

सांगली ( सुधीर गोखले) – सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी अखेर आय ए एस तृप्ती धोडमिसे यांची नियुक्ती झाली आज त्यांनी कार्यभार स्वीकारताच मी कामाच्या दर्जाबाबत मी कोणत्याही प्रकारची तडजोड स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट करत यापूर्वी जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या मॉडेल स्कुल आणि स्मार्ट पी एच सी सारख्या लोकाभिमुख योजना तत्कालीन सीईओ डूडी यांनी राबवल्या त्या योजना अधिक सक्षमपणे आणि अधिक गतिमान आपण करू.
टक्केवारी साठी कोणी कामाच्या दर्जाबाबत तडजोड करत असल्यास आपण खपवून घेणार नाही नागरिकांनी त्यांना कोठेही प्रशासनात अडचण आल्यास आपल्याशी संपर्क साधावा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. टक्केवारी विरुद्ध कोणालाही अडवणूक झाल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करू असा इशाराही त्यांनी दिला.
जितेंद्र डूडी यांची सातारा येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर बऱ्याच दिवसांपासून सांगली झेड पी चे सीईओ पद रिक्त होते दोन दिवसांपूर्वी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी शासनाने नियुक्ती केल्यानंतर आज त्यांनी पदभार स्वीकारला.
सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासक असल्याने माझ्यावर निश्चितपणे जिल्ह्याची जबाबदारी अधिक आहे मी सर्व खातेनिहाय विभागप्रमुख आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन जिल्ह्याचा एकंदरीत आढावा घेणार आहे. जलजीवन मिशन सारखी कामे मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यामध्ये सुरु आहेत ती दर्जेदार होण्याच्या दृष्टीने मी स्वतः लक्ष घालून ती कामे लवकर कशी पूर्ण होतील हे पाहीन सध्या पावसाचा जोर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी आहे संभाव्य पूरपरिस्थिती बाबत खबरदारी हि प्राथमिकता राहील.
श्रीमती धोडमिसे म्हणाल्या कि जिल्ह्यामध्ये सध्या सुरू असलेल्या चांगल्या कामना कोठेही धक्का लागणार नाही याची दक्षता मी घेणार आहे तसेच जिल्हा परिषदेमध्ये सर्वसामान्य नागरिकांची कामे लवकर व्हावीत यासाठी मी नियोजन करणार आहे. कोठेही प्रशासनात कोणाचीही अडवणूक होत असेल टक्केवारी चालत असेल तर ती तात्काळ थांबली पाहिजे अन्यथा संबंधित व्यक्तीवर तात्काळ मी कारवाई करणार आहे.