येत्या मंगळवारी सोलापूर युवक काँग्रेसचा महानगरपालिकेवर हलगीनाद मोर्चा…

0
21

सोलापूर: गेल्या सहा वर्षापुर्वी सोलापूर शहरातील नागरीकांनी भारतीय जनता पार्टीच्या खोटया आश्वासनावर बळी पडून महापालिका सत्ता दिली. तसेच राज्यात, केंद्रात सुध्दा भाजप ची सत्ता आहे. पण सत्तेत आल्यानंतर त्यांना त्यांच्या आश्वासनाचा विसर पडला. रोज शहराला पाणी पुरवठा करतो म्हणून आश्वासन दिलेल्या भाजपने प्रत्यक्षात मात्र सात ते आठ दिवसाड पाणीपुरवठा अपुरा, गढुळ, कमी दाबाने पाणी पुरवठा करत आहेत.

दिवाबत्तीची सोय नाही, रस्त्यात खड्डे खड्डयात रस्ते अशी शहराची अवस्था झाली आहे. त्यामुळे अनेकांचे अपघात होऊन बळी व कायम अपंग झाले आहेत. घंटाघाडी वेळेवर येत नाही. महापालिका दावाखान्यात औषधांची साये नाही. परिवहन व्यवस्थेचे वाट लावले व महापालिका शाळांची दुरावस्था केली. स्वच्छतागृहाची वाट लावली. शहरातील मध्य भागात शौचालये बंद पाडले. नागरीकांची महिलांची मोठी गैरसोय होत आहे. नळ कनेक्शन नसताना सुध्दा पाणीपट्टी वसुली केली जात आहे.

सार्वजनिक नळ बंद करुन गोरगरीब झोपडपट्टी भागातील नागीरकांना पाण्यापासून वंचित ठेऊन त्यांचे हाल केले जात आहेत. हद्दवाढ भागातील रस्ते, दिवाबत्ती, ड्रेनेज, पाणी व्यवस्था आतापर्यंत करत आली नाही. या मुलभुत सुविधा देऊन शकले नाहीत. सोलापूरात वाहतुक व्यवस्था कोलमंडली. शहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी 54 मिटर बायपास रस्ता महापालिकेचा अनगोंदी कारभारामुळे रस्ता पुर्ण करता आले नाही. महापालिकेतील विविध खात्यातील भोखाळलेला भ्रष्टाचारामुळे प्रशासनाचा मनमानी कारभारामुळे सोलापूर शहरातील नागरीकांच्या समस्या सोडविता आले नाही. महापालिकेच्या निवडणुका दिड वर्षापासून घेतले नाही. प्रशासनावर कोणाचा अंकुश नाही.

या जनतेच्या प्रश्नासाठी, हितासाठी सोलापूर महापालिका प्रशासनाच्या विरोधात सोलापूर युवक काँग्रेसच्यावतीने भापज सरकार व सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात येत्या मंगळवारी सकाळी 11.00 वाजता चार पुतळा येथून महानगरपालिके पर्यंत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य आमदार प्रणिती शिंदे, महाराष्ट्र युवक प्रदेशाध्याक्ष कुणाल राऊत, प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, अनिकेत म्हात्रे, शरण पाटील, प्रशांत ओगले, विजयसिंह चौधरी, दिपक राठोड, महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रभारी उदय बानूचिंब, एहसान खान, सोलापूर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन नरोटे, काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, बाबा मिस्त्री, श्रीनिवास नल्लमवार यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश हलगीनाद मोर्चा निघणार असून यामध्ये हजारोच्या संख्येने युवक सहभागी होणार आहेत. या पत्रकार परिषदेस गणेश डोंगरे, अनंत मेहेत्रे, श्रीकांत वाडेकर, प्रवीण जाधव, वाहिद विजापूरे, महेश लोंढे, महेश जोकारे आदी मान्यवर उपस्थित होते..