कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील बावी येथील मंदिरात सोमवारी सकाळी आठ ते दहा दिवसांचे नवजात अर्भक आढळून आले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बावी येथील सिद्धेश्वर मंदिराजवळ एक पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी आली होती. या गाडीतून चार पुरुष व एक महिला हातात लहान बाळाला घेऊन उतरले व मंदिरात जाऊन ते लहान बाळ तिथेच सोडून आलेल्या गाडीतून कुर्डूवाडीच्या दिशेने घाईगडबडीने निघून गेले.








