सोलापूर : महापालिकेचा covid-19 चा १२ जुलै चा अहवाल प्राप्त झाला आहे. रविवारी रात्री बारा वाजता संपलेल्या चोवीस तासांत शहरामध्ये नव्याने अवघ्या तीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे.
या कालावधीत रुग्णालयातून कोरोनामुक्त होऊन १४ जण घरी परतले आहेत. एकाचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे.कोरोना रुग्ण कमी झाल्याने आता निर्बंध कमी करण्याची मागणी व्यापाऱ्यांमधून होत आहे.








