भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपुरात राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले असून राज्यातून एक लाख युवा कार्यकर्ते या अधिवेशनास उपस्थित राहणार असून सोलापुरातून आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा जिल्हा सरचिटणीस मनिष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते नागपुरात दाखल झाले असून लोकसभा निवडणुकीचे बिगुल या अधिवेशनाच्या माध्यमातून वाजणार आहे.

युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,केंद्रीय मंत्री स्मृती इराणी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजयुमो राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांची प्रमुख उपस्थिती आहे.

यंदाच्या वर्षीच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा मान महाराष्ट्र राज्याला मिळाला असून हा मेळावा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता युवा महाराष्ट्र प्रदेश ने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप सरचिटणीस विक्रांत पाटील व भाजयुमो प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ताकद पणाला लावली होती व या माध्यमातून एक लाख युवा कार्यकर्ते विकसित भारताचे ब्रँड अँबेसरेडर होणार असल्याची माहिती भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी दिली
सोलापुरातून भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने, भाजयुमो सरचिटणीस महेश देवकर,भाजयुमो दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्ष डोंगरेश चाबुकस्वार,ओंकार होमकर,श्रीशैल हिरेपठ,विशाल बनसोडे,यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी उपस्थित आहेत