महापालिकेचा निकाल राज्यसभेप्रमाणेच लागणार : नवनीत राणा

0
12

येस न्युज नेटवर्क : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे आज राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. या भेटीपूर्वी नवनीत राणा यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राज्यपालांशी चर्चा करणार आहे. तसेच, आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईची कन्या म्हणून भाजपचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगतिले. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीसाठी नवनीत राणा यांचा प्रचार यशस्वी होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राणा दाम्पत्य राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनात पोहोचले. मात्र या भेटीपूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. त्यावेळी त्या म्हणाल्या, “राज्यपालांना भेटण्यासाठी माझ्याकडे अनेक विषय आहेत, आणि सर्व विषय महाराष्ट्राशी संबंधित आहेत, त्या सर्व विषयांवर मी यावेळी चर्चा करणार आहे. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन त्याबाबतही चर्चा करणार असून आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईची कन्या म्हणून भाजपचा प्रचार करणार आहे”, असे त्यांनी सांगितले.