महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील ६७३ पदांकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षेची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३, दि. ४ जून २०२३ रोजी ही परीक्षा होईल.
विविध विभागातील ६७३ पदाकरिता हि भरती होणार आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे
सामान्य प्रशासन विभागामध्ये २९५ पदे
पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृदा व जलसंधारण विभागात १३० पदे
सार्वजनिक बांधकाम विभागात १५ पदे
अन्न व नागरी विभागात ३९ पदे
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात १९४ पदे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काल या भरतीसंबंधातली सविस्तर जाहीरात वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. अधिक माहितीसाठी आयोगाच्या वेबसाईटला भेट देऊ शकता
खालील पदांसाठी असणार भरती
उपजिल्हाधिकारी एकूण ९ पदे
राज्यकर सहाय्यक आयुक्त एकूण १२ पदे
गट विकास अधिकारी एकूण ३६ पदे
सहाय्यक संचालक, वित्त व लेखा सेवा एकूण ४१ पदे
सहाय्यक कामगार आयुक्त एकूण २ पदे
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी एकूण ५१ पदे
मंत्रालय कक्ष अधिकारी एकूण १७ पदे
लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील कक्ष एकूण १ पदे
सहाय्यक गट विकास अधिकारी एकूण ५० पदे
मुख्याधिकारी एकूण ४८ पदे
उपअधीक्षक भूमी अभिलेख एकूण ९ पदे
उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क एकूण ४ पदे
कौशल्य विकास, रोजगार अधिकारी एकूण ११ पदे
उदयोग अधिकारी एकूण ४ पदे
सहायक कार्यकारी अभियंता एकूण ८९ पदे
सहायक अभियंता एकूण १ पदे
सहायक कार्यकारी अभियंता एकूण १० पदे
जल संधारण अधिकारी एकूण १० पदे
सहायक अभियंता – विद्युत एकूण १५ पदे
निरीक्षक, वैद्य मापन शास्त्र एकूण ३९ पदे
अन्न सुरक्षा अधिकारी एकूण १९४ पदे