सोलापुरात सोमवंशीय क्षत्रिय समाजाचा अनोखा सामाजिक उपक्रम
सोमवंशीय क्षत्रिय समाजाच्या वतीने १५१ बालकांचा सामुदायिक व्रतबंध (मुंज) सोहळा रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी सोलापुरातील सहस्रार्जुन प्रशाला येथे उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात पार पडला. समाजातील धार्मिक परंपरा, संस्कार आणि सामाजिक एकोपा जपण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्याला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भवानी पेठेतील सहस्त्रार्जून प्रशालेत हजारो बांधवांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमास गुलबर्गा येथील परमपूज्य जयश्री माताजी यांची दिव्य उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्षत्रिय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजीव बिदी होते. प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार विजयकुमार देशमुख उपस्थित होते.
यावेळी महानगरपालिकेचे नगरसेवक अमोल शिंदे, अविनाश महादेव पाटील,यांच्यासह राजू भूमकर, नित्यानंद दर्बी, गिरीश दर्बी, सुरेश बिद्री, जयकुमार कोल्हापुरे संजीव रंगरेज,गणेश दामजी परशुराम लोमटे, यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१५१ बालकांवर एकाच वेळी धार्मिक संस्कार घडविणारा हा उपक्रम समाजातील एकतेचा आणि सांस्कृतिक परंपरेच्या जतनाचा प्रेरणादायी आदर्श ठरला.













