झेडपीच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी महारुद्र नाळे यांची शासनाने केली नियुक्ती…

0
29

सोलापूर : जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार उपशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांच्याकडे देण्यात आला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे मंगळवारी सायंकाळी हि ऑर्डर काढली.

मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सीईओ आव्हाळे यांनी माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मारुती फडके यांना शासनाकडे परत पाठवण्याचा प्रस्ताव राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडे पाठवणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर माध्यमिकचा पदभार देणार कुणाकडे? असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर उपशिक्षणाधिकारी अंधारे किंवा उपशिक्षणाधिकारी नाळे यांच्यापैकी एकाला पदभार मिळेल अशी माहिती देताना न सांगता रजेवर गेलेल्या उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याबाबत यांनी पत्रकारांसमोर नाराजी व्यक्त केली होती. अनेक दिवसापासून नाळे हे शिक्षणाधिकारी पदासाठी इच्छुक होते परंतु त्यांना संधी मिळाली नाही शेवटी त्यांच्या डोक्यावर माध्यमिक शिक्षण विभागाचा काटेरी मुकुट आला आहे.

सेवक संच दुरुस्ती, शालार्थ आयडी, माहिती अधिकार, न्यायालयीन प्रकरणे, आस्थापना विषयक कामांसाठी सहा कर्मचाऱ्यांवर आज सीईओ आव्हाळे यांनी माध्यमिक शिक्षणची जबाबदारी सोपविली आहे. वेतन पथकाचे अधीक्षक प्रकाश मिश्रा, प्राथमिकच्या शिक्षण विस्ताराधिकारी गोदावरी राठोड, जलसंधारणाचे कनिष्ठ प्रशासनाधिकारी कुमारगौरव शिंदे यांना मूळ विभागाचे कामकाज सांभाळून माध्यमिकचे कामकाज पहावे लागणार आहे. सामान्य प्रशासनाचे वरिष्ठ सहायक विक्रम शहा, ग्रामपंचायतचे कनिष्ठ सहायक घनश्याम मस्के, प्राथमिकचे कनिष्ठ सहायक अल्ताफ पटेल यांना माध्यमिकचे पूर्ण वेळ कामकाज सोपविण्यात आले आहे.