लोकमंगल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मायलॅब या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड

0
29

वडाळा येथील श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालयाअंतर्गत बीएससी व एम एस सी जैवतंत्रज्ञान, बीएससी उद्योजकता व एम एस सी उद्योजकता, बीकॉम, एम एस सी सूक्ष्मजीवशास्त्र एम एस सी ऑरगॅनिक केमिस्ट्री असे विविध कोर्स चालवले जातात. बदलत्या परिस्थितीचा विचार करून या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी त्यांच्या प्लेसमेंट कडे जातीने लक्ष दिले आहे. वर्षभरामध्ये विविध विभागाच्यावतीने प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्यू व भरती मेळावे अशा पद्धतीचे उपक्रम राबविले जातात तसेच होतकरू व गुणी विद्यार्थ्यांना नेहमीच महाविद्यालयामार्फत प्रोत्साहन दिले जाते.

विविध क्षेत्रामध्ये असणाऱ्या संधींबाबत विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन दिले जाते.याचाच भाग म्हणून महाविद्यालयातील एम एस सी जैवतंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या चार विद्यार्थ्यांची पुणे येथील मायलॅब रिसर्च लॅबोरेटरीज या संशोधन संस्थेमध्ये विविध पदावरती निवड झाली. यामध्ये प्रवीण शिंदे व दत्तात्रेय सातपुते यांची प्रोडक्शन ऑफिसर म्हणून तर श्रीकांत मदने व भरत गुंड यांची संशोधन सहाय्यक म्हणून निवड झाली.

या यशाबद्दल संस्थेच्या सचिव डॉ अनिता ढोबळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीशकुमार देवकर, जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ किरण जगताप, प्रा अंकुश गोरट्याल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.