• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात होणार कै. आण्णासाहेब पाटील यांचे स्मारक

Yes News Marathi by Yes News Marathi
September 25, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापुरात होणार कै. आण्णासाहेब पाटील यांचे स्मारक
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील पहिले बलिदान देणारे माथाडी कामगारांचे नेते कै. आण्णासाहेब पाटील यांच्या सोलापुरातील स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या मुख्य सभेत कै. आण्णासाहेब पाटील यांच्या स्मारकाला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे 25 सप्टेंबर रोजी 88 वी जयंती आहे. त्या पुर्वसंध्येला हा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेत मंजूर झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव आणि किरण पवार यांनी महापालिकेकडे स्मारकाची मागणी केली होती. त्यानंतर सोलापूर महापालिकेतील
शिवसेनेच्या नगरसेविका मंदाकिनी पवार, गुरुशांत धुत्तरगांवकर, कॉंग्रेसचे नगरसेवक विनोद भोसले, भाजपचे किरण देशमुख, प्रभाकर जामगुंडे यांनी हा प्रस्ताव मुख्य सभेत मांडला होता. त्यानंतर आज झालेल्या मुख्य सभेत ही मागणी मंजूर करण्यात आली आहे.

कै. आण्णासाहेब पाटील यांचे हे स्मारक निराळे वस्ती येथील माटे बगीचा येथे उभारण्यात येणार आहे. या स्मारकामध्ये राम जाधव आणि किरण पवार यांनी विविध मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये कै. आण्णासाहेब पाटील यांचा पुर्णाकृती पुतळ्यासह संपूर्ण परिसर सुशोभीकरण करावे. तसेच कै. आण्णासाहेब पाटील यांचे जीवनकार्याची माहिती कोनशिलेच्या माध्यमातून व्हावी अशा स्वरुपाची मागणी होती. ही मागणी सभागृहात सर्वपक्षीय गटनेते तसेच विरोधीपक्षनेते आणि सभागृह नेत्यांनी एकमताने मंजूर केली.

सोलापूर महापालिकेने कै. आण्णासाहेब पाटील यांच्या 88 व्या जयंतीच्या पुर्वसंध्येला ही मागणी मान्य केल्याने त्यांना संपूर्ण सोलापूरकरांच्यावतीने कृतीशील अभिवादन केल्याची आमची भावना आहे. त्यामुळे सोलापूर महापालिकेतील सर्व गटनेते, विरोधीपक्षनेते, सभागृह नेते तसेच सर्व नगरसेवकांचे मनपूर्वक आभार मानतो. – राम जाधव, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा, सोलापूर

कै. आण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पहिले बलिदान दिले असले तरी त्यांनी आठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांच्या उन्नतीसाठी माथाडी संघटना स्थापन केली होती. त्यामुळे त्यांचे स्मारक सोलापूर शहरात होणे ही त्यांना खरी आदरांजली आहे. सोलापूर महापालिकेतील सर्व नगरसेवकांचे शतशः आभार. – किरण पवार, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा, सोलापूर

Previous Post

यूपीएससीचे निकाल जाहीर; शुभम कुमार देशात पहिला, महाराष्ट्राची मृणाली जोशी ३६वी!

Next Post

राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरू करणार

Related Posts

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…
इतर घडामोडी

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

June 25, 2026
वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी
इतर घडामोडी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

June 24, 2026
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक
इतर घडामोडी

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा
इतर घडामोडी

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६
इतर घडामोडी

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026
श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
Next Post
राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरू करणार

राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरू करणार

ताज्या बातम्या

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

June 25, 2026
आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

June 25, 2026
बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

June 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026