भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी टी20 असणार निर्णायक

0
30

येस न्युज मराठी नेटवर्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु टी20 मालिकेतील अखेरचा सामना आता पार पडणार आहे. हैद्राबादमध्ये पार पडणारा हा सामना निर्णायक असणार आहे. कारण तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्यावर दुसरा सामना भारताने जिंकत मालिकेत 1-1 ची बरोबरी घेतली आहे. त्यामुळे आता मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असणार आहे. सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकणार आहे. त्यामुळे या सामन्यांमध्ये आता उत्सुकता लागलीय आहे.

कसे आहेत दोन्ही संघ?

भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, दीपक चाहर.

ऑस्ट्रेलिया संघ –

आरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), अॅश्टन अगर, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅडम झाम्पा, नॅथन एलिस, डॅनियल सेम्स, शॉन अॅबॉट.