सोलापूर शहरातील काही व्यापाऱ्यावर बुधवारी सकाळीच इन्कम टॅक्स ने छापेमारी केली. यामध्ये काही सराफ तसेच काही बिल्डरांचा समावेश आहे. इन्कम टॅक्स च्या कोल्हापूर, औरंगाबाद तसेच पुणे विभागातून विविध अधिकारी गाड्या घेऊन सकाळी सात वाजताच शहरातील सात ते आठ ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी छापेमारी सुरू केली. या संदर्भात इन्कम टॅक्स विभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. मात्र एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर धाडी पडल्यामुळे सोलापूरच्या व्यापारी आणि उद्योग जगतात खळबळ निर्माण झाली आहे.

