येस न्युज मराठी नेटवर्क : सोरेगाव येथील सोलापूर महानगरपालिका आरोग्य केंद्र येथे सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर व उपायुक्त धनराज पांडे यांच्या संकल्पनाने आयोजित केलेले “मिशन संजीवनी” या उपक्रमाचे उद्घाटन नगरसेविका राजश्री चव्हाण, व प्रभाग 24 च्या नगरसेविका संगीता जाधव यांचे हस्ते करण्यात आले. प्रथम दीपप्रज्वलन करून धन्वंतरी भगवान यांची पूजा करण्यात आली.
यावेळी नगरसेविका राजश्री चव्हाण व संगीता जाधव यांनी सोलापूरच्या जनतेस आवर्जून सांगितले की आपण आपल्या आजारपणासाठी उच्च दर्जाचे औषधे घेत असतो व बरे झाल्यानंतर सदरचे औषध फेकून देत असतो परंतु ते औषधे फेकून न देता “मिशन संजीवनी” या उपक्रमामध्ये सांगितल्याप्रमाणे गरजू लोकांना त्याचा उपयोग होईल व ते आजारातून मुक्त होतील याचा दुवा लागेल असे सांगितले.
सदर कार्यक्रमचे आयोजन डॉ.संस्कृती वळसंगकर यांनी केले होते. सूत्रसंचालन मदन पोलके सर यांनी केले. त्यावेळी असंख्य प्रमाणात आशा वर्कर व सदर महापालिका आरोग्य केंद्राचे अधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

