सोलापूर : शहराचा covid-19 चा २८ मे रोजी चा अहवाल प्राप्त झाला आहे. गुरुवारी रात्री १२ वाजता संपलेल्या २४ तासात सोलापूर शहरात नव्याने ३० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे या कालावधीत ४३ जण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. ह्या कालावधीत कोरोनामुळे ३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. प्रभागनिहाय बाधित रुग्णांचा आढावा घेतला असता प्रभाग क्रमांक २४ मध्ये सर्वाधिक सात रुग्ण आढळले आहेत प्रभाग क्रमांक ६ मध्ये ५ रुग्ण आढळले असल्याचे महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

