होटगी आणि गुळवंची जि.प. शाळेला लोकमंगलचा आदर्श शाळा पुरस्कार

0
22

10 सप्टेंबर रोजी होणार वितरण
सोलापूर : लोकमंगल फाऊंडेशन आणि लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे दिल्या जाणार्‍या शिक्षकरत्न आणि आदर्श शाळा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कार योजनेतील आदर्श शाळा पुरस्कार होटगी (ता. दक्षिण सोलापूर) आणि गुळवंची (ता. उत्तर सोलापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार दि. 10 सप्टेंबर, रोजी सकाळी 11 वा. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात होणार आहे. यास प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ हे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी आ. श्री. सुभाष देशमुख असणार आहेत.

कर्तबगार व्यक्तीच्या शिक्षकाला देण्यात येणारा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुरस्कार अंकोली येथील राहुल देशपांडे यांच्या शिक्षिका हरिभाई देवकरण प्रशालेतील निवृत्त शिक्षिका विद्या लिमये यांना देण्यात येणार आहे. राहुल देशपांडे हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अमेरिकेत कार्यरत आहेत. त्यांनी मास्टर कार्ड कंपनीत सिनिअर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम केलेले आहे.

या पुरस्कार योजनेतील नवोपक्रमशील शिक्षकासाठीचा पुरस्कार माळशिरस तालुक्यातील ताम्हणे वस्तीच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक महेश गायकवाड यांना देण्यात येईल. आदर्श कला शिक्षक म्हणून सांगोला येथील प्रमोद डोंबे यांना पुरस्कार दिला जाईल. तर विशेष शिक्षक पुरस्कार सोलापूरच्या राधा किसन फोमरा मूकबधीर विद्यालयाच्या मुख्यध्यापिका क्षितिजा गाताडे यांना दिला जाईल. वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी असलेल्या पुरस्कारासाठी दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विरभद्र चनबस दंडे यांची निवड करण्यात आली आहे.

उर्वरित पुरस्कार पुढीलप्रमाणेः
प्राथमिक :- 1) प्रिया सुरवसे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बेलाटी), ज्योती कलुबर्मे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवाजीनगर, ता. मंगळवेढा), माध्यमिक मारुती शहाणे (हरिभाई देवकरण प्रशाला), अब्दुल कादर ईसाक शेख (न्यू इंग्लिश स्कूल, कुसूर, ता. दक्षिण सोलापूर.) शिवाजी व्हनकडे ( नरसम्मा बसप्पा बंडा प्रशाला, माधव नगर, सोलापूर) कनिष्ठ महाविद्यालय:- 1) प्रा. धनाजी भानुदास चव्हाण (सांगोला विद्या मंदिर ज्युनिअर कॉलेज, सांगोला) पुरस्काराचे स्वरूप :- 4 हजारांची पुस्तके.