Home इतर घडामोडी राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी दिलासा मिळण्यासाठी ममता बॅनर्जीनी केलेला अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून...
- मुंबई हायकोर्टानं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना झटका दिला आहे. आपल्याविरोधातील तक्रार रद्द करण्यात यावी यासाठी त्यांनी दाखल केलेली याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यामुळं ममतांच्या अडचणी वाढणार आहेत.
- मुंबई भेटीदरम्यान ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अपमान केला होता. याप्रकरणी त्यांच्याविरोधात भाजप नेते विवेकानंद गुप्ता यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. ही तक्रार रद्द व्हावी यासाठी त्यांनी हायकोर्टात अर्ज दाखल केला होता, हा अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे.
- गेल्यावर्षी मुंबई दौऱ्यावर असताना ममता बॅनर्जी यांनी एका कार्यक्रमात खाली बसूनच राष्ट्रगीताला सुरुवात केली. तसेच राष्ट्रगीत सुरू असताना त्या मध्येच थांबल्या. त्यामुळं राष्ट्रगीताचा अपमान होतो, असा युक्तीवाद करत भाजपचे मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी मुंबई पोलिसांत ममता बॅनर्जीविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी भाजप नेत्यांनी कोर्टात ममता बॅनर्जीविरोधात याचिका दाखल केली. यावर ममता बॅनर्जी यांना शिवडी न्यायालयाकडून समन्सही बजावण्यात आलं होतं. ममता बॅनर्जींना 2 मार्च 2022 रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश कोर्टानं दिले होते.