बऱ्याच दिवसापासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या डीएड, तसेच बी एड पदवीधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. लाखो उमेदवार बऱ्याच दिवसापासून ज्याची वाट पाहत होते त्या शिक्षक भरतीची प्रक्रिया शासनाने सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी शैक्षणिक संस्था मधील शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मे 2026 पर्यंत रिक्त होणारी संभाव्य पदे विचारात घेऊन ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे. एक ते 31 मे या कालावधीत शाळांच्या व्यवस्थापनांना शाळांमध्ये असलेल्या रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्याची मुदत दिली आहे. एकूण रिक्त पदाच्या 80 टक्केच भरती केली जाणार आहे. बऱ्याच दिवसानंतर ही भरती होणार असल्यामुळे प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

