• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरातील रूग्णालयांच्या ऑक्सिजन वापराबाबत नियंत्रण ठेवा – पालकसचिव दिनेश वाघमारे

Yes News Marathi by Yes News Marathi
May 10, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापुरातील रूग्णालयांच्या ऑक्सिजन वापराबाबत नियंत्रण ठेवा – पालकसचिव दिनेश वाघमारे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि.10: जिल्ह्यातील कोणत्याही रूग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू होऊ देऊ नका. ऑक्सिजनचा तुटवडा भासू देऊ नका. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता असणाऱ्या रूग्णांनाच देण्याचे नियोजन करा, यासाठी रूग्णालयांच्या ऑक्सिजनवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकसचिव तथा उर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी केल्या.

       वाघमारे यांनी आज जिल्ह्यातील कोरोना स्थिती, ऑक्सिजन, लसीकरण याबाबत ऑनलाईन बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, वैश्यंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर आदी उपस्थित होते.

         वाघमारे यांनी सांगितले की, ऑक्सिजनचा आणि व्हेंटिलेटरचा वापर करताना दवाखान्यात, डीसीएच, डीसीएचसीमध्ये प्रशिक्षीत स्टाफ असायला हवा. त्यांना आणखी प्रशिक्षण द्या, ऑक्सिजनच्या बाबतीत कोठेही अनुचित प्रकार होणार नाही, यासाठी फायर ऑडिट करा. कोरोना रूग्णांच्या दवाखान्यात कोठेही विजेची अडचण येणार नाही, हे पहा. रूग्ण पहिल्या स्टेजमध्येच उपचारासाठी पोहोचला पाहिजे, याचेही नियोजन करा. जिल्ह्यात कोठेही रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही, याचीही दक्षता घ्या. इंजेक्शनची गरज आणि वापर कमी करा, रेमडेसिवीरची बनावट विक्री होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 

        जिल्ह्यात रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रूग्णसंख्या वाढणार नाही, याकडे लक्ष द्या. ग्रामीण भागाचा मृत्यू दर 1.60 तर शहराचा 7.86 टक्के आहे, याकडेही कटाक्षाने लक्ष द्या. यासाठी कृती आराखडा तयार करा. जिल्ह्याला सीएसआर निधीमधून साहित्य, यंत्रसामग्री उपयोगात येणारी आणि हाताळण्यास सुलभ असणारीच खरेदी करावीत. हा निधी उर्जा विभाग उपलब्ध करून देणार आहे, असेही श्री. वाघमारे यांनी सांगितले. 

        सर्वांनी लसीकरणासाठी प्रयत्नशील राहून जास्तीत जास्त लस जिल्ह्यासाठी मिळण्याबाबत नियोजन करावे. लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही, याचीही दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

        शंभरकर यांनी कोरोनाची स्थिती, ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि हॉस्पिटलची स्थितीची माहिती दिली. रूग्णसंख्येबाबत डॉ. जाधव यांनी सादरीकरण केले. 

        जिल्ह्यातील 115 हॉस्पिटलमध्ये पाच अभियंता महाविद्यालयाच्या तज्ज्ञांना पाठवून त्रुटी दूर करून फायर ऑडिट केले आहे. ऑक्सिजनसाठी नवीन 14 ठिकाणी प्लान्ट बसवत असून सध्या 48 मेट्रीक टन एवढा ऑक्सिजन प्राप्त आहे. सर्व डॉक्टरांना ऑक्सिजन बचतीच्या सूचना दिल्याचे श्री. शंभरकर यांनी सांगितले. 

        स्वामी म्हणाले, तालुका, जिल्हा रूग्णालयांवर भार पडू नये, यासाठी जिल्यान त 100 ठिकाणी पाच हजार लोकसंख्येच्या गावात कोविड केअर सेंटर उभारणार आहे. यापैकी 60 ठिकाणी सीसीसी सुरू झाले असून जिल्हा परिषदेमार्फत औषध पुरवठा करण्यात येत असून खाजगी डॉक्टरांची सेवा घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

        शिवशंकर यांनी सांगितले की, शेजारील राज्यातील, जिल्ह्यातून शेवटच्या स्टेजमधील रूग्ण येत असल्याने मृत्यू दर शहराचा वाढत आहे. शहरात 335 डीसीएच/डीसीएचसी दवाखाने असून 448 आयसीयू आणि 191 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. मनपाच्या वेबसाईटवर रोज बेड उपलब्धेबाबत माहिती दिली जाते.

        रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून जिल्ह्यात तीन केसेस नोंद केल्या आहेत. कडक लॉकडाऊनची कारवाई सुरू असून 250 होम गार्ड, 10 रेल्वे पोलीस अधिकारी यांच्याही सेवा घेण्यात आल्या आहेत. पोलिसांना कोरोना झाला तर तत्काळ उपचारासाठी पंढरपूर पोलीस संकुल येथे केवळ 38 तासांत  सर्व सुविधायुक्त 82 बेडच्या कोविड हॉस्पिटलची उभारणी  केली आहे. यामध्ये 42 ऑक्सिजनचे बेड व इतर 40 बेड असल्याची माहिती श्रीमती सातपुते यांनी दिली. 

        डॉ. कडूकर यांनी सांगितले की, शहरात लॉकडाऊनबाबत दंडात्मक कारवाई सुरू आहे. होलसेल आणि रिटेल विक्रेत्यांच्या तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. पोलिसांसाठी 30 बेड ऑक्सिजन  तर 30 खाजगी व्यक्तींसाठी सोय केली आहे.
Previous Post

आधार युवा फाऊंडेशनकडून गोरगरीबांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप

Next Post

जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई, दीड लाखाच्या मद्याच्या बाटल्या आणि हातभट्टी रसायन जप्त

Related Posts

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!
मुख्य बातमी

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 15, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
Next Post
जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई, दीड लाखाच्या मद्याच्या बाटल्या आणि हातभट्टी रसायन जप्त

जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई, दीड लाखाच्या मद्याच्या बाटल्या आणि हातभट्टी रसायन जप्त

ताज्या बातम्या

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026
सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026