सोलापूर – जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. नेहासिंह रोडा यांनी आयोजित केलेल्या हीलिंग हॅण्ड्स फिजिओथेरपी,ऑस्टिओपॅथी व आयुर्वेद सेंटर येथे आयोजित मोफत तपासणी शिबिरास उत्तम प्रतिसद मिळाला.यावेळी गुडघ्याचे, मणक्याचे, न्यूरोचे,सांधेदुखी, मनगट व घोट्याचे,मायग्रेन यासह विविध आजारांची तपासणी करून उपचार करण्यातआले.आयुर्वेदामध्ये हृदयरोग, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर, मुतखडा, पित्ताशय खडा यासह विविध तपासणी करण्यात आली. उपचारासाठी १५ मिडल क्लास हौसिंग सोसायटी, रिमांड होम समोरील बोळात संपर्क साधावा.