केंद्राचे झाले ..राज्याचे झाले.. महापालिकेचे बजेट कधी ?

0
295

सोलापूर : गेल्या चार वर्षापासून महापालिकेत बजेट सादर करण्याला सत्ताधारी भाजपला अपयश येत आहे केंद्र सरकारचे तसेच राज्य सरकार चे बजेट सादर होऊन ते मंजूर झाले अद्याप सोलापूर महापालिकेला बजेट सादर करायला मुहूर्त मिळाला नाही विशेष म्हणजे सन 2020-21 या बजेटवर गेल्या महिन्यात वर्ष संपताना काथ्याकूट करण्यात आला. आता नवे आर्थिक वर्ष सुरू होण्यासाठी अवघ्या वीस दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे असे असताना महापालिका आयुक्तांनी देखील आपली प्रशासकीय बजेट सभागृहाकडे सादर केले नाही 31 मार्च किंवा तत्पूर्वी महापालिकेचे बजेट मंजूर होणे कायद्याने बंधनकारक आहे मात्र या बाबीकडे कोणीच गांभीर्याने पाहताना दिसत नाही.