सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघानुसार तयार करण्यात आलेल्या पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदार संघाची प्रारूप यादी काल बुधवार दिनांक 3 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली.ही यादी मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
प्रारूप याद्या जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत संकेतस्थळावरही पाहता येतील.नागरिकांना दुरुस्ती संबंधीची माहिती तपासून आवश्यक असल्यास हरकती सादर करता येतील असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण सुरवसे यांनी सांगितले आहे.

