• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लोकमान्य टिळकांना प्रेरणा देणारा सोलापुरातील आजोबा गणपती

Yes News Marathi by Yes News Marathi
August 31, 2022
in मुख्य बातमी
0
लोकमान्य टिळकांना प्रेरणा देणारा सोलापुरातील आजोबा गणपती
0
SHARES
0
VIEWS

अविनाश व्यंकटेश कुलकर्णी / सोलापूर : सोलापूरच्या शुक्रवार पेठेतील श्रद्धानंद समाजाच्या आजोबा गणपतीचे हे 137 वे वर्ष. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवास 1893 मध्ये पुण्यात सुरु झाली. तत्पूर्वी 8 वर्षे अगोदर सोलापुरात शुक्रवार पेठेतील कार्यकर्त्यांनी शेटे वाड्यासमोर सार्वजनिक आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना केली. महाराष्ट्रातील हे पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. लोकमान्य टिळक व सोलापूरचे आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध होते. लोकमान्य 1875 पासून सोलापुरात येत होते. सोलापुरात त्यांचा मुक्काम इंद्रभुवनचे निर्माते कै.अप्पासाहेब वारद यांच्या निवासस्थानी असे. सोलापुरात आल्यानंतर घरगुती गणेशोत्सवात गौरीसमोर केलेली सजावट पाहण्यासाठी व पानसुपारी कार्यक्रमासाठी ते वार द यांच्यासमवेत जात असत. त्यामुळे लोकमान्य यांना गणेशोत्सव सार्वजनिक करण्याची प्रेरणा आजोबा गणपतीपासून मिळाली असावी असा अनुमान सोलापुरात काढला जातो.

सोलापूरच्या सार्वजनिक आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना 1885 मध्ये शुक्रवार पेठेतील त्यावेळचे प्रमुख कार्यकर्ते कै. मल्लिकार्जुनप्पा कावळे, कै महालिंगप्पा वजीरकर, मल्लिकार्जुनप्पा शेटे, संगनबसय्या नंदीमठ, देवबा मंठाळकर, देशमुख, गणेचरी ,काटकर, म्हमाणे, ओनामे, दर्गो-पाटील, श्रीगिरी , नंद्याल, आवटे आदी घराण्यातील प्रमुख व्यक्तींनी एकत्रित येऊन भक्तिपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहाने आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना केली होती. कामट्या, रद्दी कागद ,खळ , चिंचुक्याचे पीठ, कापड आदी वस्तूच्या मदतीने आजोबा गणपतीची पर्यावरणपूरक मूर्ती त्याकाळात कै निलाप्पा उजळंबे, आडव्याप्पा माळगे, औटे या मूर्तिकरांनी मिळून तयार केली. सुरुवातीला काही वर्षे शेटे यांच्या घरासमोर व त्यानंतर त्रिपुरातकेश्वर मंदिरात आजोबा गणपतीचा गणेशोत्सव साजरा केला जात असे. आजोबा गणपती गणेशोत्सव साजरा करण्याची जबाबदारी दुसऱ्या पिढीकडे आल्यानंतर खास म.बसवेश्वर मंडळाची स्थापना करण्यात आली. कै पंचप्पा जिरगे, कै. सिद्रामप्पा फुलारी , इरय्या स्वामी , अण्णाराव वजीरकर, हत्तुरे, नंदीमठ, कळमनकर आदी घराण्यातील प्रमुख व्यक्तींचा या मंडळामध्ये सहभाग होता. यानंतर आजोबा गणपती उत्सवाची सूत्रे श्रद्धानंद समाजाकडे आली. लाहोर उच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकील लाला मुन्शीराम यांनी दीक्षा घेतल्यानंतर ते स्वामी श्रद्धानंद या नावाने ओळखले जात असत. एका माथेफिरू तरुणाने त्यांची 18 डिसेंबर 1926 रोजी त्यांच्या निवासस्थानी जाऊन हत्या केली होती. त्यानंतर सोलापुरात या घटनेच्या निषेधार्थ बंद पाळण्यात आला. सिद्रामप्पा फुलारी, रेवनसिद्धप्पा खराडे , नागप्पा शरणार्थी, नागय्या धोत्री , इरय्या कोरे आदींनी देवालयात एकत्र येऊन श्रद्धानंद समाजाची स्थापना सोलापुरात केली. या समाजातर्फे तरुणांमध्ये आत्मविश्वास, राष्ट्र प्रेम निर्माण करण्यासाठी लाठी, तलवार व दांडपट्टा चालविण्याचा वर्ग सुरु करण्यात आला. एक व्यायामशाळाही सुरु करण्यात आली. स्वातंत्र्य लढयासाठी लोकजागृती करण्यासाठी श्रद्धानंद समाजाच्या गणेशोत्सवातील मेळावे भरविले जात असत. हुतात्मा कै. मल्लाप्पा त्याचे व्यवस्थापक म्हणून काम पाहत असत. शुक्रवार पेठेत त्यामुळेच स्वातंत्रसैनिकांची संख्या जास्त आहे. सिद्धेश्वर मंदिरातील शिखराच्या कामासाठी केरळचे कलाकार 1983 मध्ये सोलापुरात आल्यानंतर आजोबा गणपतीची मूर्ती जीर्ण झाल्याने माजी महापौर कै विश्वनाथ बनशेट्टी अप्पा यांनी आजोबा गणपतीची नवीन मूर्ती त्यांच्याकडून तयार करून घेतली. त्यानंतर जुन्या मूर्तीचे टाकळी येथे भीमा नदीत विसर्जन केले. शुक्रवार पेठेतील बनशेट्टी यांच्या ट्रंक कारखान्याच्या मोकळ्या जागेत बरीच वर्षे गणेशोत्सवात आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना केली जात असे. त्यानंतर सध्याच्या जागेत आजोबा गणपती मंदिराची आकर्षकरित्या उभारणी करण्यात आली. श्रद्धानंद समाजाचे अध्यक्ष गौरीशंकर फुलारी, रेवणसिद्ध बनशेट्टी व सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. श्रद्धानंद समाजात काम करणारे कै सिद्रामप्पा फुलारी , कै विश्वनाथ बनशेट्टी ,कै चंद्रशेखर म्हमाणे , प्रभाकर वनकुद्रे , चिदानंद वनारोटे , रोहिणी तडवळकर, स्नेहल निंबाळे , शोभा बनशेट्टी आदी पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. श्रद्धानंद समाजाने स्वातंत्र्य चळवळीत मोलाची कामगिरी केली. लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याचा घेतलेला निर्णय किती योग्य होता हे श्रद्धानंद समाजातील कार्यकर्त्यानी स्वातंत्र्य चळवळीत दिलेल्या योग दानावरून सिद्ध होते.

Previous Post

खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, दसरा मेळावाही त्यांचाच होणार – नारायण राणे

Next Post

राजेश आण्णा कोठे गणेशोत्सव मंडळ स्थापना मिरवणूक जल्लोषात संपन्न

Related Posts

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!
मुख्य बातमी

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!

July 20, 2026
TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !
मुख्य बातमी

TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !

July 19, 2026
विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी
मुख्य बातमी

विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी

July 19, 2026
TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन

July 18, 2026
TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!
मुख्य बातमी

TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!

July 17, 2026
TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!
मुख्य बातमी

TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!

July 16, 2026
Next Post
राजेश आण्णा कोठे गणेशोत्सव मंडळ स्थापना मिरवणूक जल्लोषात संपन्न

राजेश आण्णा कोठे गणेशोत्सव मंडळ स्थापना मिरवणूक जल्लोषात संपन्न

ताज्या बातम्या

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

July 22, 2026
आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

July 22, 2026
माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

July 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026