येस न्युज मराठी नेटवर्क : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांपासूनच आम आदमी पक्षानं मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे निवडणुकींच्या कलांनुसार, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा विजय झाल्याचं जवळपास निश्चितच झालं आहे. आपनं जवळपास 90 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला पंजाबमध्ये मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस 18 जागांवर आघाडी आहे. निवडणूक निकालांतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह पराभूत झाले आहेत. पटियाला मतदार संघातून अमरिंदर सिंह यांचा पराभव झाला आहे. पटिलायामध्ये आम आदमी पक्षाचे अजित पाल सिंह कोहली विजयी झाले आहेत.
