अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभरात फसव्या औषध जाहिराती आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या औषध विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे .या मोहिमेत 73 लाख 24 हजार 656 रुपयांचा औषध साठा जप्त करण्यात आला आहे .आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कार्यभार स्वीकारल्यावर जनतेच्या आरोग्य सुरक्षेसाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्यात विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. पुणे विभागात 21 पूर्णांक 83 लाख रुपयांचा मिसब्रँडेड ऍलोपथी औषध साठा ही आढळून आला आरोग्याशी खेळ करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.











