सोलापूर : प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी एका इसमांकडून दोन लाखाची मागणी करून एक लाखावर तडजोड केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील फौजदार विक्रमसिंह रजपूत याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तक्रारदाराच्या मित्रावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयाचा तपास हा रजपुत करत असून, सदर गुन्हयामध्ये मदत करण्यासाठी व तक्रारदार यांचे मित्र यांचेवर यापूर्वीही अॅट्रोसिटी व इतर गुन्हे दाखल असून त्यांचेवर कारवाई न करण्यासाठी पीएसआय विक्रम रजपुत यांनी स्वताःसाठी व पोनि राजन माने यांचे नावे म्हणून २ लाख रुपयांची लाचेची मागणी करुन तडजोडी अंती एक लाख रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली. यासंदर्भात पुढील एमआयडीसी पोलिसांकडून सुरु आहे .