सोलापूर : महिला आर्थिक विकास महामंडळ, सोलापूर शाखेच्या यवतीने महिला दिनाचे औचित्य साधुन सोलापुरातील नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू तसेच खाद्यपदार्थांचे प्रदर्शन तसेच विक्री सुरू झाली आहे. आजपासून तीन दिवस हे प्रदर्शन सोलापूरकरांना पाहता येणार आहे. सोलापूर 301 सोलापूर जिल्ह्यातील गावातील 8534 बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या ग्रामीण भागातील विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद या ठिकाणी घेता येणार आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम तसेच पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, त्यांच्या धर्मपत्नी महीमा कुलकर्णी, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नितीन शेळके, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त संगीता खंदारे, विभागीय व्यवसाय विकास सल्लागार सिद्धिराम माशाळे, उद्योगवर्धिनीच्या चंद्रिका चव्हाण, PSI सुरेखा शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांनी बचत गटाच्या उत्पादनासाठी जिल्हास्तरावर एक स्वतंत्र दालन निर्माण करून त्या ठिकाणावरून सर्व उत्पादनाची विक्री व मार्केटिंग होईल आणि लवकरच याची सुरवात होईल असे आश्वासन दिले.

याप्रसंगी महीमा अतुल कुलकर्णी यांनी महिलां बरोबर संवाद साधत महिला पुरुषांपेक्षा कमी नाहीत. आणि त्याही कोणत्याही कामात पुढाकाराणे पुढे आल्यास त्या कामात उच्च शिखरावर पोहचतील अशी अशा व्यक्त केली.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी बोलताना म्हणाले, पोलीस प्रशासन सदैव महिलांन सोबत आहे. महिलांना कोणत्याही अडचणी असल्यास त्यानी पोलिसांची निसंकोच संपर्क करावा असे अहवान केले.
सिद्धिराम माशाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माविम तर्फे चालवण्यात येणारे उपक्रम व नवतेजस्विनी प्रकल्प अंतर्गत उप-प्रकल्प अंमलबजावणी बाबत मार्गदर्शन केले
कर्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा समन्वयक अधिकारी सोमनाथ लांमगूंडे यांनी माविमची सोलापूर तालुक्यातील वाटचाल व प्रगती बाबत मनोगत व्यक्त केले. यावेळी मोहोळ तालुक्यातील बचत गट सदस्य, पदाधिकारी व स्टाफ उपस्तित होते. कार्यक्रमचे सूत्रसंचालन प्रशांत गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश भारत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाढण्यासाठी माविम जिल्हा कार्यलय, मोहोळ व माळशिरस तालुका स्टाफ यांचे सहकार्य मिळाले











