• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तृतीयपंथीयांविषयी प्रत्येकांमध्ये आपुलकीची भावना हवी: शमीबा पाटील

Yes News Marathi by Yes News Marathi
January 31, 2025
in इतर घडामोडी
0
तृतीयपंथीयांविषयी प्रत्येकांमध्ये आपुलकीची भावना हवी: शमीबा पाटील
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय तृतीयपंथीय परिषदेचा समारोप

सोलापूर, दि. 31- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने महाराष्ट्रात प्रथमच तृतीयपंथीयांच्या समस्येवर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करून एका वेगळ्या विषयाला स्पर्श केले. त्यांच्या समस्येवर मंथन करण्याबरोबरच त्यांच्याविषयी एक आपुलकीची भावना दाखवत समाज जागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले. याचा आदर्श राज्यातील इतर विद्यापीठांनी घेण्याबरोबरच माणूस म्हणून प्रत्येकानी तृतीयपंथीयांविषयी आपुलकीची भावना ठेवावी, असे आवाहन महाराष्ट्र तृतीयपंथीय कल्याणकारी मंडळाच्या सदस्या शमीबा पाटील यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुल आणि समाजसेवक ब्रिजमोहन फोफलीया यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात आयोजित दोन दिवसीय तृतीयपंथीयांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप शमीबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झाला. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, समाजसेवक ब्रिजमोहन फोफलीया, सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, कौशल्य विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शमीबा पाटील म्हणाल्या की, आज समाजात तृतीयपंथीयांविषयी दुजाभाव केला जातो. वास्तविक त्यांच्याकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे. संघर्षमय जीवन जगताना त्यांच्या अनेक समस्या असतात. त्या सोडवण्याबरोबरच त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात आपुलकीची भावना निर्माण होणे आवश्यक आहे. तृतीयपंथी ऐवजी पारलिंगी हा शब्द वापरला पाहिजे. त्यांच्याविषयी गैरसमज व भेदभाव न करता माणुसकीची भावना ठेवून नेहमी मदत करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुल व ब्रिजमोहन फोफलीया यांच्या टीमने यशस्वीरित्या तृतीयपंथीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले. अभ्यासक व संशोधकांनी यात शोधनिबंध सादर केले. प्रत्यक्ष तृतीयपंथी देखील यात सहभागी झाले. भविष्यकाळात देखील विद्यापीठाकडून तृतीयपंथीयांसाठी सुविधा केंद्र, शिक्षणाची सोय आदी उपक्रम राबविण्यात येईल, असे ही त्यांनी यावेळी सागितले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, समाजसेवक ब्रिजमोहन फोफलीया, डॉ. गौतम कांबळे, डॉ. प्रभाकर कोळेकर आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार डॉ. अंबादास भासके यांनी मानले.

सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात तृतीयपंथीयांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप शमीबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झाला. यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, समाजसेवक ब्रिजमोहन फोफलीया, सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, कौशल्य विभागाचे सचालक डॉ. प्रभाकर कोळेकर आदी.

Previous Post

लातूर जिल्ह्यातील तब्बल 25 हजार 136 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले….

Next Post

सरकार विचारांचे दिवाळखोर आहे राहुल गांधी यांची बोचरी टिका…

Related Posts

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
Next Post
सरकार विचारांचे दिवाळखोर आहे राहुल गांधी यांची बोचरी टिका…

सरकार विचारांचे दिवाळखोर आहे राहुल गांधी यांची बोचरी टिका…

ताज्या बातम्या

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

May 13, 2026
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

May 13, 2026
सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026