एलग्रीसचा समावेश टॉप 10 मध्ये

0
17

सोलापूर – गेल्या दहा वर्षापासून सोलापुरात कार्यरत असलेल्या आणि आपल्या उत्कृष्ट ग्राहक सेवेच्या माध्यमातून जगभरातील सोलर कंपन्यांमध्ये वाखाणल्या गेलेल्या एलग्रीस सोलार सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा समावेश भारतातील अपारंपरिक ऊर्जा निर्माण करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये झाला आहे.बंगळूर येथून प्रसिद्ध पण आल्या इंडस्ट्री आऊटलुक या इंग्रजी मासिकाने, अपारंपारिक ऊर्जा साधनांच्या व्यवसायात गुंतलेल्या नव्या स्टार्टअप कंपन्यांवर विशेषांक प्रसिद्ध करण्याचे ठरवले असून, या क्षेत्रातील 200 स्टार्टअप कंपन्यांची यादी करून त्यांचा सविस्तर अभ्यास करून त्यातल्या 10 म्हणजे टॉप टेन कंपन्यांचा समावेश अंकात करण्याचे ठरवले आहे. अशा पहिल्या दहा स्टार्ट अप कंपन्यांचे व्यवस्थापन, आलोडन, विक्रीपश्चात सेवा, तसेच वीज निर्मिती, उद्योजकांना माफक दरात सोलार प्रकल्प उभारून देण्यासाठी राबवले जाणारे उपक्रम, अशा सर्व अंगांनी या कंपनीची माहिती अंकात प्रसिद्ध केली जाईल. हे मासिक अपारंपरिक वीज निर्मितीतील कंपन्यांवर प्रथमच विशेषांक प्रसिद्ध करत आहे. या मासिकाच्या माध्यमातून सोलापूरच्या एलग्रीस सोलार सिस्टीम या कंपनीची माहिती जगभर माहित होणार आहे.सोलापूरच्या औद्योगिक विश्वाला आणि एलग्रीस सोलार सिस्टीम या कंपनीला मिळालेला हा मान अभिमानास्पद आहे अशी प्रतिक्रिया एलग्रीस सोलार सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संपत कुमार धूत यांनी व्यक्त केली आहे.