रशियाची चंद्रमोहिम अयशस्वी

0
43

रशियाची चंद्रमोहिम अपयशी ठरल्याची मोठी अपडेट समोर आली आहे. रशियाचं लुना-25 अंतराळयान चंद्रावर क्रॅश झालं आहे. रशियन अंतराळ संशोधन संस्था रोसकॉसमॉसने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. रशियाचं लुना-25 अंतराळयान 21 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार होतं. रशियाने तब्बल 47 वर्षानंतर चंद्रमोहिम हाती घेतली होती. मात्र, ही चंद्रमोहिम अयशस्वी ठरली आहे. जवळपास पन्नास वर्षानंतर रशिया चंद्रावरील संशोधन करत आहे. रशियाने 10 ऑगस्ट रोजी 1976 मध्ये लुना-24 पाठवले होते. त्या मोहिमेनंतर जवळपास पाच दशकांनंतर प्रथमच लुना-25 अंतराळात पाठवण्यात आलं. त्याने चंद्राकडे जाण्याचा अधिक थेट मार्ग स्वीकारला होता. 11 दिवसांत म्हणजे 21 ऑगस्टला ‘लुना-25’चंद्रावर उतरणार होतं. हे यान अधिक शक्तीशाली आणि खर्चिक रॉकेटद्वारे चंद्राच्या दिशेने निघाले होते. यानाच्या हलक्या वजनाच्या डिझाईन आणि इंधन साठवणुकीच्या क्षमतेमुळे कमी वेळेत हे यान चंद्राच्या कक्षात पोहचलं होतं. मात्र, चंद्र मोहिम पूर्ण होण्याच्या आधीच हे अंतराळयान क्रॅश झालं आहे.