• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री – प्रशासनात वाद: चक्क मुख्यमंत्र्यांवर आली मध्यस्थी करण्याची वेळ

Yes News Marathi by Yes News Marathi
October 28, 2025
in मुख्य बातमी
0
मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री – प्रशासनात वाद: चक्क मुख्यमंत्र्यांवर आली मध्यस्थी करण्याची वेळ
0
SHARES
0
VIEWS

मुंबई – राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मुद्यावरून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री व प्रशासनात चांगलाच वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरत सरकारने घोषित केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचा आरोप केला. त्यावर अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादात हस्तक्षेप करत अधिकाऱ्यांना आजपर्यंत करण्यात आलेल्या मदतीची आकडेवारी सादर करण्याचे आदेश दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारची आज मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अद्याप त्यांच्या खात्यात पोहोचली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. ‘तुम्ही सरकारकडून देण्यात आलेली मदत पोहोचली म्हणता, जिल्हाधिकारीही मदत दिली म्हणतात, पण प्रत्यक्षात शेतकरी मदत मिळाली नसल्याचा दावा करतात’, असे ते या प्रकरणी प्रशासनाला धारेवर धरताना म्हणाले. त्यावर प्रशासनाने पुन्हा एकदा ‘आमच्याकडून शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचल्याचा’ दावा केला.

यावरून मंत्री व प्रशासन यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली. हा वाद वाढत असल्याचे पाहून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात हस्तक्षेप केला. आतापर्यंत झालेल्या मदतीसंदर्भात आजच आढावा बैठक घ्या व शेतकऱ्यांपर्यंत किती मदत पोहोचली याची माहिती सादर करा, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री काय म्हणाले ?

बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधतानाही त्यांनी आजच्या बैठकीत अतिवृष्टी व महापुरासंबंधी सरकारने घोषित केलेल्या पॅकेजचा आढावा घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टी व महापुराशी संबंधित सरकारने घोषित केलेल्या पॅकेजचा आढावा घेतला. या प्रकरणी आतापर्यंत 8 गजार कोटी रीलिज झाले आहेत. त्यानुसार 40 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचले आहेत. सरकारने अजून 11 हजार कोटींना मान्यता दिली आहे. सरकार या प्रकरणी 90 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यांत पैसे जमा करण्याचा प्रयत्न करत आहे. उर्वरित 10 टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये किंवा कागदपत्रांमध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या देखील लवकरच सोडवण्यात येतील, असे ते म्हणाले.

Agristack नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, Agristack पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याची गरज नाही. सरकारकडे त्यांची माहिती आधीपासून उपलब्ध असल्याने निधी थेट त्यांच्या बँक खात्यात पाठवला जाणार आहे. ही व्यवस्था प्रक्रियेला गती देणार असून, शेतकऱ्यांना कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची किंवा सरकारी कार्यालयांची धावपळ करावी लागणार नाही.

उद्धव ठाकरेंकडून फॅक्ट चेकचे आदेश

उल्लेखनीय बाब म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या घरी जाऊन सरकारने घोषित केलेल्या मदतीचा वाटा पोहोचला का? हे पडताळून पाहण्याचे आदेश दिलेत. या प्रकरणी शिवसैनिक घरोघरी जाऊन फॅक्ट चेक करत असताना मंत्रिमंडळ बैठकीत या मुद्यावरून वाद झाल्यामुळे त्याची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.

Previous Post

मंत्रि मंडळनिर्णय..

Next Post

आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी..

Related Posts

TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख
मुख्य बातमी

TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख

July 2, 2026
TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा

June 30, 2026
“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड
मुख्य बातमी

“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड

June 29, 2026
TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…
मुख्य बातमी

TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…

June 29, 2026
TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…
मुख्य बातमी

TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…

June 28, 2026
“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”
मुख्य बातमी

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026
Next Post
आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी..

आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी..

ताज्या बातम्या

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 2, 2026
डॉ. किरण देशमुख यांच्या हस्ते ५०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

डॉ. किरण देशमुख यांच्या हस्ते ५०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

July 2, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026