• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मराठी भाषेच्या समृद्धतेत दिवसेंदिवस वाढ: डॉ. वडगबाळकर

Yes News Marathi by Yes News Marathi
February 27, 2025
in इतर घडामोडी
0
मराठी भाषेच्या समृद्धतेत दिवसेंदिवस वाढ: डॉ. वडगबाळकर
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर विद्यापीठात छत्रपती शंभूराजे साहित्य पुरस्कारांचे वितरण

सोलापूर, दि. 27- माय मराठी भाषेला हजारो वर्षांची वैभवशाली परंपरा आहे. संत, कवी, लेखक व साहित्यिकांनी ही भाषा समृद्ध केली आहे. आता 21 व्या या शतकातही मराठी भाषेच्या समृद्धतेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सोलापूर शाखेच्या अध्यक्षा डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर यांनी केले.

गुरुवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शंभुराजे साहित्य पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. यात प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. वडगबाळकर या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा,  कुलसचिव योगिनी घारे, भाषा संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयातील डॉ. चंद्रकांत चव्हाण यांना शिक्षक गटातून तर अधिकारी व कर्मचारी गटातून विद्यापीठातील डॉ. शिरीष बंडगर यांना छत्रपती शंभुराजे साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अमोगसिद्ध चेंडके यांनी केले. मान्यवरांचा परिचय श्रुती देवळे यांनी करून दिला. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.  केदारनाथ काळवणे यांनी पुरस्काराविषयी माहिती दिली.

डॉ. वडगबाळकर म्हणाल्या की, भाषा ही जगण्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. भाषेकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. भाषेमुळे व्यक्तिमत्व विकास घडतो. मराठी भाषा ही विविधतेने नटलेली आहे. संस्कृती टिकण्यासाठी देखील भाषा महत्वाची असते, असे प्रतिपादन देखील त्यांनी यावेळी केले.

प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा म्हणाले की, मराठी भाषेला मोठी परंपरा आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठीचा सन्मान वाढविला आहे. मराठी भाषेची गोडी एक वेगळीच असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमास राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. सचिन गायकवाड, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. राजेंद्र वडजे यांच्यासह शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली यांनी केले तर आभार प्रा. विद्या काळे यांनी मानले.


सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शंभुराजे साहित्य पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. याप्रसंगी डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा,  कुलसचिव योगिनी घारे, भाषा संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे व अन्य.

Previous Post

नूतन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन

Next Post

मराठी भाषेचे महत्व जपा – मन्मथ उकरंडे

Related Posts

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
मराठी भाषेचे महत्व जपा – मन्मथ उकरंडे

मराठी भाषेचे महत्व जपा - मन्मथ उकरंडे

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026