• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अश्विनी तडवळकर यांना कल्पतरूकार पुरस्कार जाहीर

Yes News Marathi by Yes News Marathi
February 12, 2024
in इतर घडामोडी
0
अश्विनी तडवळकर यांना कल्पतरूकार पुरस्कार जाहीर
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – येथील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थतर्फे दरवर्षी देण्यात येणारा कल्पतरूकार कै. ल.गो. काकडे स्मृती पत्रकार पुरस्कार यंदा दैनिक दिव्य मराठी सोलापूर आवृत्तीच्या वरिष्ठ बातमीदार अश्विनी तडवळकर यांना देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष डॉ.श्रीकांत येळेगावकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

पुरस्कार वितरण कार्यक्रम शनिवार दि.17 फेब्रुवारी 2024 रोजी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात (ऍम्फी थिएटर) सायंकाळी 6.00 वाजता होणार आहे. गेल्या 18 वर्षापासून संस्थेतर्फे संस्थेचे संस्थापक तसेच कल्पतरु आणि आनंदवृत्त या सोलापुरातील आद्य साप्ताहिकाचे संपादक कै. ल. गो. तथा तात्यासाहेब काकडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. पाच हजार रुपये रोख संशोधन शिष्यवृत्ती, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. याचवेळी दै. सकाळ तनिष्का विभाग प्रमुख रजनीश जोशी यांचा पत्रकार आणि लेखक या नात्याने पुस्तक लेखनाबद्दल विशेष सन्मान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण कार्यक्रम ज्येष्ठ पत्रकार आणि ऍनालायझर या चॅनलचे संपादक सुशील कुलकर्णी यांच्या हस्ते आणि जिल्हा सरकारी वकील ऍड. प्रदीप सिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुशिल कुलकर्णी यांचे बदलत्या युगाची माध्यमे या विषयावर व्याख्यानही होणार आहे.

यापूर्वी कै. अरुण रामतीर्थकर, अरुण खोरे, अविनाश कुलकर्णी, रमेश महामुनी, एजाज हुसेन मुजावर, विजयकुमार पिसे, शांतकुमार मोरे, दत्तात्रय आराध्ये, प्रशांत जोशी, रजनीश जोशी, राजा माने, अभय दिवाणजी, श्रीकांत कांबळे, रविंद्र देशमुख, संजय पाठक, विक्रम खेलबूडे, अरविंद जोशी व रेवणसिध्द जवळेकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था 2 ऑगस्ट 1931 रोजी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याच्या उद्देशाने सोलापुरात स्थापन करण्यात आली. संस्थेतर्फे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दरवर्षी सुमारे एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. संस्थेतर्फे वधू-वर सूचक मंडळ, गुणीजनांचा सत्कार, स्पर्धा परिक्षेत निवड झालेल्यांचा सत्कार व मार्गदर्शन, शालेय मुलांसाठी पाठांतर स्पर्धा, परिसंवाद, सामुदायिक मौजी बंधन, रक्तदान शिबीर, स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबीर,महिला मेळावा इत्यादी उपक्रम नियमित आयोजित केले जातात, अशी माहितीही संस्थेचे अध्यक्ष डॉ. येळेगावकर यांनी दिली. या कार्यक्रमास सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही डॉ. येळेगावकर यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर, उपाध्यक्ष दत्तात्रय आराध्ये, विजय कुलकर्णी, कार्यवाह श्याम जोशी, खजिनदार सतीश पाटील, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, युवक अध्यक्ष सुशांत कुलकर्णी, आदी उपस्थित होते.

Previous Post

तबल्याचे बोल व बासरीच्या सुरांची जुगलबंदी आणी पं कैवल्यकुमार यांचा बहरत गेलेला मारू बिहाग याने झाली प्रिसिजन संगीत मोहोत्सवाची सांगता

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त स्वराज सप्ताह शुभारंभ संपन्न…..

Related Posts

पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.

October 1, 2026
हिरज वन्यजीव हद्दीत वन्यजीव संवर्धनाचे नवे पर्व!
इतर घडामोडी

हिरज वन्यजीव हद्दीत वन्यजीव संवर्धनाचे नवे पर्व!

October 1, 2026
ज्योतीराम चांगभले यांना वारकरी सेवा भूषण व अजित कवडे यांना जीवन गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

ज्योतीराम चांगभले यांना वारकरी सेवा भूषण व अजित कवडे यांना जीवन गौरव पुरस्कार

October 1, 2026
एक तास स्वच्छतेसाठी; सोलापूर जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी सामूहिक श्रमदान
इतर घडामोडी

एक तास स्वच्छतेसाठी; सोलापूर जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी सामूहिक श्रमदान

October 1, 2026
‘निरोगी गाव’ निर्मितीसाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक– जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड
इतर घडामोडी

‘निरोगी गाव’ निर्मितीसाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक– जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड

October 1, 2026
सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात
इतर घडामोडी

सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात

September 30, 2026
Next Post
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त   स्वराज सप्ताह शुभारंभ संपन्न…..

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त स्वराज सप्ताह शुभारंभ संपन्न…..

ताज्या बातम्या

पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.

पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.

October 1, 2026
19 डिसेंबर रोजी सोलापुरात रंगणार भारुडासह भक्ती संगीत आणि लोककलेचा नादोत्सवम 2026 हा कार्यक्रम

19 डिसेंबर रोजी सोलापुरात रंगणार भारुडासह भक्ती संगीत आणि लोककलेचा नादोत्सवम 2026 हा कार्यक्रम

October 1, 2026
हिरज वन्यजीव हद्दीत वन्यजीव संवर्धनाचे नवे पर्व!

हिरज वन्यजीव हद्दीत वन्यजीव संवर्धनाचे नवे पर्व!

October 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026