• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करा – जिल्हाधिकारी

Yes News Marathi by Yes News Marathi
January 11, 2021
in मुख्य बातमी
0
रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करा – जिल्हाधिकारी
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर,दि.11: जिल्ह्यातील रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या.

        जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज झाली. बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, अर्चना गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संभाजी धोत्रे, पोलीस उपायुक्त रुपाली दरेकर, ग्रामीण वाहतुक शाखेचे निरीक्षक प्रविण सपांगे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, नगरअभियंता संदीप कारंजे, सोलापूर महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता विष्णू कांबळे आदी उपस्थित होते.

        सुरुवातीला  डोळे यांनी  जिल्ह्यातील अपघातांच्या संख्येबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी गेल्या वर्षभरात अपघातांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचे सांगितले.

        शंभरकर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील आणि शहरातील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी ब्ल्यू प्रिंट हवी. कारण  अपघाताची संख्या कमी होण्याबरोबरच मृत्यूची संख्याही कमी होण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रित येवून काम करण्याची गरज आहे. अपघात कमी करण्यासाठी लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यातील अपघात प्रवण ठिकाणे कमी होण्यासाठी उपाय आखले जावेत. जनतेमध्ये वाहतूक सुरक्षेबाबत साक्षरता करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग करुन घ्यावा.

        लॉकडाऊनमुळे घटले अपघात, मृत्यूचे प्रमाण

गेल्या वर्षात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे शहर आणि जिल्ह्यातील अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या आकडेवारीनुसार 2019 च्या तुलनेत अपघातांच्या टक्केवारीत 35 टक्के, मृत्यूच्या प्रमाणात 25 टक्के तर जखमींच्या प्रमाणात 30 टक्के घट झाली आहे.

        पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आकडेवारीनुसार अपघातात 35 टक्के, मृत्यूच्या प्रमाणात 22 टक्के आणि  जखमींमध्ये 37 टक्के घट झाली आहे.  मात्र यापेक्षा अजूनही प्रमाण घटण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

        मात्र लॉकडाऊनच्या कालावधीत हुतात्मा एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस आणि इतर रेल्वे बंद असल्यामुळे अनेक नागरिकांनी दुचाकी आणि खाजगी वाहनातून प्रवास केला. त्यामुळे अपघाताची संख्या वाढल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक एलियास सय्यद यांनी सांगितले.बैठकीत . झेंडे, कदम आणि श्रीमती दरेकर यांनी आपली मते मांडली .
Previous Post

महाराष्ट्रात लसीकरणाची मोहीम यशस्वीरीत्या राबवावी – मुख्यमंत्री

Next Post

राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जानिर्मितीस चालना देणार – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

Related Posts

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मुख्य बातमी

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
Next Post
राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जानिर्मितीस चालना देणार – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जानिर्मितीस चालना देणार - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026