काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : राहुल गांधींच्या नकारामुळे अशोक गेहलोत निवडणुकीच्या रिंगणात

0
12

येस न्युज नेटवर्क : काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे सारे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अध्यक्षपदाच्या दावेदारीवरुन राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत. मात्र, हळूहळू चित्र स्पष्ट होत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी स्वत: या निर्णयाची घोषणा केली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आपण अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता गेहलोत हे अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

अशोक गेहलोत हे आत्तापर्यंत राहुल गांधींचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जाईल, त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे उत्तर देत होते. मात्र, गेहलोत हे राहुल गांधींसोबत केरळमध्ये भारत जोडो यात्रेत सामील झाले. यादरम्यान राहुल गांधींचे मन वळवण्याचा शेवटचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, राहुल गांधी यांनी निवडणूक लढवण्या स्पष्ट नकार दिला. त्यानंतर गेहलोत यांनी आपण काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं आहे. त्यामुळं आता सस्पेन्स संपला आहे.