सोलापूर : दैनिक पुण्यनगरी सोलापूर आवृत्तीचे विभागीय व्यवस्थापक व्यंकटेश पटवारी यांच्या मातोश्री सौ. उषा भास्करराव कुलकर्णी – पटवारी यांचे बुधवार, दि. २२ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्या ८३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, चार मुले, चार सुना, आठ नातवंडे असा परिवार आहे. उद्या दि. २३ मे रोजी मौजे बऱ्हाणपूर (ता. औसा, जि. लातूर) येथे सकाळी ९ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बऱ्हाणपूर हे गाव औसा-भाधा रोडवर औसापासून ९ किलोमीटर अंतरावर आहे.