• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी अटकेतील आरोपीस सशर्त जामीन मंजूर…..

Yes News Marathi by Yes News Marathi
December 4, 2025
in इतर घडामोडी
0
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी अटकेतील आरोपीस सशर्त जामीन मंजूर…..
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात दिनांक ०४ मार्च २०२५ रोजी गु.र. क्र. ०१३६/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(२)(आय), १३७(२) आणि ३५१(२) तसेच बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा, २०१२ चे कलम ४, ८ आणि १२ प्रमाणे आरोपी सिद्धलिंगप्पा शिवलिंगप्पा कलदे (वय २८, रा. मदन हिप्परगा, ता. आळंद, जि. कलबुर्गी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता.

फिर्यादी यांनी दिनांक ०४/०३/२०२५ रोजी दिलेल्या जबाबात नमूद केले की, आरोपी सिद्धलिंगप्पा कलदे हा मैंदर्गी, ता. अक्कलकोट येथील बोरी नावाच्या शेताला लागून असलेल्या शेतात ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत असे आणि त्यांची व त्यांच्या अल्पवयीन मुलीची आरोपीसोबत गेल्या १५ दिवसांपासून ओळख झाली होती.


दिनांक ०३ मार्च २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता फिर्यादीची मुलगी घरातून बोरी शेताकडे जात असल्याचे सांगून निघाली. दुपारी १२:०० वाजताच्या सुमारास आरोपी सिद्धलिंगप्पा कलदे याने मुलीला भेटून ‘तुला घरी सोडतो’ असे सांगून आपल्या मोटारसायकलवर बसवले, परंतु तिला मैंदर्गी येथे न सोडता तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिला जबरदस्तीने मादनहिप्परगा, जि. गुलबर्गा, कर्नाटक येथे पळवून नेले. तेथील मंदिरात फिरवून परत आणले आणि मैंदर्गी येथील बोरी नावाच्या शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये रात्री ०९:०० वाजताच्या सुमारास तिच्या इच्छेविरुद्ध, अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच, याबद्दल आई-वडिलांना सांगितल्यास त्यांना संपवून टाकेन अशी धमकी देऊन तिला मैंदर्गी नाक्यावर सोडून निघून गेला. त्यानंतर फिर्यादीने पोलीस ठाण्यात येऊन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.

आरोपी सिद्धलिंगप्पा शिवलिंगप्पा कलदे यास दिनांक १०/०३/२०२५ रोजी अटक करण्यात आली होती.तद्नंतर आरोपी सिद्धलिंगप्पा कलदे याने जामिनासाठी मे.जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे आपला जामीन अर्ज दाखल केला होता तो अर्ज नामंजूर झाल्यानंतर आरोपी तर्फे मा.मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ येथे जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.

सदर प्रकरणी आरोपीतर्फे वकिलांनी असा युक्तिवाद केला की, घटना घडली त्या वेळी पिडित मुलगी अंदाजे १५ वर्षांची होती. घटनेनंतरचा कालावधी पाहता, पीडिता सुमारे २४ तास आरोपीसोबत होती, परंतु त्या कालावधीत तिने कोणताही आरडाओरडा केला नाही, मदतीसाठी बाहेरील व्यक्तींशी संपर्क केला नाही किंवा तिला बळजबरी करण्यात आल्याचे तत्काळ संकेत दिले नाहीत. आरोपीस अटक होऊन आजतागायत ८ महिन्यांहून अधिक कालावधी लोटला असून तो संपूर्ण कालावधी न्यायालयीन कोठडीत आहे. आरोपीचे कोणतेही गुन्हेगारी पूर्वइतिहास नसून त्याच्यावर यापूर्वी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही. तसेच सर्व परिस्थितींचा एकत्रितपणे विचार केल्यास, आरोपीस जामीन मंजूर करण्यात यावा.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती शिवकुमार दिघे साहेब, मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ यांनी दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी आरोपी सिद्धलिंगप्पा शिवलिंगप्पा कलदे यास सशर्त जामीन मंजूर केला आहे.

सदर प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी,ॲड. सौरभ तांदळे, ॲड. दत्तात्रेय कापुरे, ॲड. वैभव बोंगे, ॲड. ओंकार फडतरे, ॲड. रोहित थोरात, ॲड. मोहीम पठाण, ॲड. शिवरत्न वाघ, ॲड. मनिष बाबरे, ॲड. अभिषेक नागटिळक, ॲड. अजय वाघमारे आणि ॲड. त्वरिता वाघ यांनी काम पाहिले.

Previous Post

५१ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा…

Next Post

जिल्हास्तर युवा महोत्सव 2025-26 चे आयोजन…

Related Posts

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती
इतर घडामोडी

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026
SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…

August 31, 2026
डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!
इतर घडामोडी

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!
इतर घडामोडी

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026
लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत
इतर घडामोडी

लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत

August 31, 2026
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
Next Post
जिल्हास्तर युवा महोत्सव 2025-26 चे आयोजन…

जिल्हास्तर युवा महोत्सव 2025-26 चे आयोजन…

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

August 31, 2026
पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

August 31, 2026
एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026