१५ ऑगस्टपर्यंत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनची कामे पुर्ण करा : सीईओ स्वामी

0
21

सोलापूर – ओडिफ प्लस मध्ये सोलापूर जिल्ह्यातील कामगिरी खुप निराशा जनक काम झाले आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ची कामे पुर्ण करा. या साठी ९० दिवसांचा कार्यक्रम देणेत येत आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज गटविकास अधिकारी , ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता, शाखा अभियंता, विस्तार अधिकारी पंचायत यांची बैठक आयोजित करणेत आली होती. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, प्रमुख उपस्थित होते.

सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्सात ५५० गावांना तालुका स्तरावर प्रशासकीय व तांत्रीक मान्यता देणेत येत आहे. सरपंचानी या बाबी मध्ये लक्ष घालणे आवश्यक आहेत. सरपंचाचा सहभाग घ्या जेणे करून जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन च्या कामास गती येईल. १५ वा वित्त आयोगातील निधी खर्च होईल. येत्या १ आॅगष्ट पर्यंत ५०० ग्रामपंचायती. ओडिएफ प्लस करा असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले. दि. 13 ते 18 जुलै या कालावधीत सर्व गावकृती आराखडे तयार करा . दि. 18 जुलै ते 21 जुलै तांत्रीक व प्रशासकीय मान्यता वेळेत पुर्ण करा. दि. 21 जुलै ते 31 जुलै या कालावधीत शौषखड्डे व नॅडेप व कंपोष्ट पीट ची कामे वेळेत पुर्ण करा. या कामांची दररोज गुगल स्प्रेड शीट वर माहिती भरावी. त्या नुसार दररोज आढावा घेणेत येणार आहे. तालुका निहाय 15 लक्ष पर्यंत ची कामे गटविकास अधिकारी यांचे स्तरावर पुर्ण करावयाची आहेत. ती ३१ जूलै पर्यंत पुर्ण करा. असे आवाहन केले. गटविकास अधिकारी यांचे स्तरावर फक्त शौषखड्डे व नॅडेप बांधायचे आहेत. खुप छोटी कामे आहेत. ही कामे सुरू न झालेमुळे १५ वा वित्त आयोगाचा खर्च कमी झाला आहे.

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ची कामे झाली नाहीत. या कामांना १५ वा वित्त आयोगातील ३० टक्के निधी आहे त्यामुळे १५ वा वित्त आयोगाचा देखील खर्च झाला नाही याला कोण जबाबदार आहे ? असा सवाल उपस्थित करून त्यांनी नाराजी व्यक्त केली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी सर्व ग्राम पंचायतीचे डीपीआर पाच दिवसात करून प्रशासकीय व तांत्रीक मान्यता द्या. तालुका निहाय 15 लक्ष पर्यंत ची कामे गटविकास अधिकारी यांचे स्तरावर पुर्ण करावयाची आहेत. ती ३१ जूलै पर्यंत पुर्ण करा. १ आॅगष्ट ला जिल्ह्याचे काम ५० टक्के पुर्ण होणे अपेक्षित आहेत. गटविकास अधिकारी यांचे स्तरावर फक्त शौषखड्डे व नॅडेप बांधायचे आहेत. ही कामे वेळेत पुर्ण करा असे सांगितले.

उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी १५ वा वित्त आयोग व स्वच्छ भारत मिशन चा खर्च वेळेत करा. ज्या ग्रामपंचायतीचे डीपीआर तयार आहेत त्यांनी उप अभियंता यांची तात्काळ तांत्रिक मंजुरी घ्या. वर्क आॅर्डर दिलेली कामे वेळेत पुर्ण करा. योजना लोकांना समजावून सांगा. नळकनेक्शन ची कामे वेळेत पुर्ण करा. असेही उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी सांगितले.
सिईओ यांच्या नाराजीने अधिकारी धास्तावले..!
………….
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन चे कामावरून नाराजी व्यक्त केली. जे अधिकारी ग्रामपंचायतींना व पंचायत समितीस दिले आहेत ते वापरावे. वेळेत कामे पुर्ण करा. नाराज करू नका. कारवाई करणे अवघड नाही. कारवाई हे अंतिम सत्य नाही. कामात सुधारणा व झालेस क्षेत्रीय अधिकारी यांना जबाबदार धरणार असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.