छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त महापालिकेकडून अभिवादन

0
21

सोलापूर– सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त जुना पुना नाका येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास व कौन्सिल हॉल येथील मा.आयुक्त यांच्या कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त मच्छिंद्र घोलप, विभागीय अधिकारी व्यंकटेश चौबे, महिला व बालकल्याण अधिकारी विठ्ठल कस्तुरे,उद्यान अधीक्षक रोहित माने, छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समितीचे सोमनाथ राऊत, बाळासाहेब गायकवाड,शिरीष जगदाळे, अमोल जाधव, प्रकाश ननवरे, सदाशिव पवार, प्रकाश व्यवहारे, सचिन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.