• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

केंद्र सरकारचं सर्वसामान्यांना ‘गिफ्ट’, एलपीजी सिलेंडरवर सबसिडीची घोषणा

Yes News Marathi by Yes News Marathi
March 25, 2023
in मुख्य बातमी
0
केंद्र सरकारचं सर्वसामान्यांना ‘गिफ्ट’, एलपीजी सिलेंडरवर सबसिडीची घोषणा
0
SHARES
0
VIEWS

केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने स्वयंपाकाच्या गॅसवर सबसिडी जाहीर केली आहे.
केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. सरकारने एलपीजी गॅसवर सबसिडी जाहीर केली आहे. उज्ज्वला योजना लाभार्थ्यांच्या एलपीजी सिलिंडर सबसिडीबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत सरकारने प्रति एलपीजी सिलिंडर 200 रुपये सबसिडी एक वर्षासाठी वाढवली ​आहे. हे अनुदान 14.2 किलोच्या 12 एलपीजी सिलेंडरवर देण्यात येईल. नव्या आर्थिक वर्षात ही सबसिडी लागू असेल. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी एलपीजी सिलेंडर स्वस्त होणार आहे.
केंद्र सरकारची सर्वसामान्यांना भेट
केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं की, सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति एलपीजी सिलिंडर 200 रुपये सबसिडी एका वर्षासाठी वाढवली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 1.6 कोटी कुटुंबांना फायदा मिळणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. यामुळे सर्वसामान्यांना महागाईच्या झळीतून काहीसा दिलासा मिळणार आहे.
एलपीजी सिलेंडरवर सबसिडीची घोषणा
उज्जला योजनेअंतर्गत वर्षभरात 12 गॅस सिलिंडर दिले जातात. मंत्री अनुराग ठाकूर यांनी नवीन अधिसूचनेनुसार सांगितलं की, उज्ज्वला योजनेच्या 9.59 कोटी लाभार्थ्यांना प्रति वर्ष 14.2 किलो एलपीजी गॅस सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी मिळणार आहे. या योजनेमध्ये सरकारकडून वर्षभरात 12 सिलिंडर देण्यात येतात. उज्जला योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून प्रत्येक सिलिंडरवर 200 रुपयांच्या अनुदान मिळते म्हणजेच केंद्र सरकारकडून एका वर्षात सबसिडीच्या स्वरूपात लाभार्थ्यांना 2400 रुपयांपर्यंत अनुदान मिळते. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, 1 मार्च 2023 पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे (PMUY – Pradhan Mantri Ujjwala Yojana) 9.59 कोटी लाभार्थी आहेत.
केंद्र सरकारवर किती बोजा पडणार?
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे 2022-23 या आर्थिक वर्षासाठी एकूण 6,100 कोटी रुपये आणि 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 7,680 कोटी रुपये खर्च होणार आहे. हा बोजा केंद्र सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हे अनुदान मंजूर करण्यात आलं आहे.
‘या’ कंपन्या आधीच अनुदान देत आहेत
सर्व प्रमुख भारतीय तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) 22 मे 2022 पासून हे अनुदान देत आहेत. अनेक कारणांमुळे एलपीजीच्या किंमतीत वाढ झाल्याचे केंद्र सरकारने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. अशा परिस्थितीत उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना यापासून संरक्षण देणं गरजेचं आहे. यासाठीच हे अनुदान मंजूर करण्यात आलं असून यामुळे गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Previous Post

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेचे वतीने शहरात विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

भारतामध्ये कोविड-19 रुग्णांची संख्या आता 4,47,02,257

Related Posts

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

July 31, 2026
आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!
मुख्य बातमी

आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!

July 31, 2026
पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !
मुख्य बातमी

पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !

July 30, 2026
भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड
मुख्य बातमी

भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड

July 30, 2026
मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन
मुख्य बातमी

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!

July 28, 2026
Next Post
भारतामध्ये कोविड-19 रुग्णांची संख्या आता 4,47,02,257

भारतामध्ये कोविड-19 रुग्णांची संख्या आता 4,47,02,257

ताज्या बातम्या

सोलापूर ग्रामीण पोलिसांचा ऐतिहासिक उपक्रम:एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पंढरपूर आषाढी वारीत 32 लाख भाविकांची अचूक मोजणी

सोलापूर ग्रामीण पोलिसांचा ऐतिहासिक उपक्रम:एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पंढरपूर आषाढी वारीत 32 लाख भाविकांची अचूक मोजणी

July 31, 2026
उद्या पंढरीला महापुराचा धोका..? 22 बंधारे पाण्याखाली…

उद्या पंढरीला महापुराचा धोका..? 22 बंधारे पाण्याखाली…

July 31, 2026
मंगळवेढा पोलीस ठाण्यातील विनयभंगाचा गुन्हा न्यायालयात सिद्ध; आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी व ₹१०,००० दंड

मंगळवेढा पोलीस ठाण्यातील विनयभंगाचा गुन्हा न्यायालयात सिद्ध; आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी व ₹१०,००० दंड

July 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026