गौतम अदानींनी विकत घेतली सिमेंट क्षेत्रातील आंबुजा सिमेंट ही मोठी कंपनी; ५ हजार कोटींचा सौदा

0
22

येस न्युज नेटवर्क :अदानी समुहाच्या पोर्टफोलिओमध्ये आता नव्या कंपनीचा समावेश झाला आहे. सिमेंट क्षेत्रात आपला दबदबा वाढवत गौतम अदानी यांची मालकी असलेल्या अंबुजा सिमेंट कंपनीच्या वतीनं संघी सिमेंटचं अधिग्रहण केल्याचं जाहीर केलं आहे. या करारांतर्गत अंबुजा सिमेंट संघी इंडस्ट्रीजच्या प्रोमोटर्सकडून 56.74 टक्के स्टेक घेणार आहे.

आठवड्यातील व्यवहाराच्या चौथ्या दिवशी गुरुवारी शेअर बाजार सुरू होण्यापूर्वीच गौतम अदानी यांच्या कंपनीनं हा करार झाल्याचं जाहीर केलं. कंपनीनं सांघी इंडस्ट्रीजचं अधिग्रहण केल्याचं सांगितलं. बिझनेस टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, अंबुजा सिमेंटनं केलेला हा सौदा 5000 कोटी रुपयांच्या एंटरप्राइझ व्हॅल्यूमध्ये झाला आहे. अंबुजा सिमेंट सध्याच्या प्रमोटर समूह रवी सांघी अँड फॅमिलीकडून संघी इंडस्ट्रीजमधील बहुसंख्य स्टेक घेणार आहे. कंपनीनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, हे अधिग्रहण संपूर्णपणे अंतर्गत स्रोतांमधून केलं जाईल.