पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन….

0
33

सोलापूर दि.2 (जि.मा.का.) :- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या महिला व संस्थाना दरवर्षी पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर पुरस्काराने गौरवण्यात येते सन 2020-2021, 2021-2022, 2022-2023, 2023-2024 या चार वर्षाकरिताचे  पुरस्कारासाठी इच्छुक महिला व संस्थाकडून  प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. दि 14 ऑगस्ट 2023 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काकटकर यांनी  केले आहे.

 राज्यस्तीरय पुरस्कार रुपये 1,00,001/ रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ, असा असून, यासाठी  महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 25 वर्षाचा समाजिककार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर पुरस्कार व सावित्रीबाई पुरस्कार प्राप्त झाला आहे अशा महिला तो पुरस्कार मिळाल्याच्या 5 वर्षापर्यंत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

 विभागीय पुरस्कार रुपये 25 हजार 1  रोख स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ, असा असून यासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 7 वर्ष कार्य असावे. नोंदणीकृत संस्थेस दलीत मित्र पुरस्कार प्राप्त नसावा, संस्था राजकारणापासून अलिप्त असावी. तसेच तिचे कार्य व सेवाही पक्षातील व राजकारणापासून अलिप्त असावी. जिल्हास्तरीय पुरस्कार  रुपये 10 हजार 01 रोख स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ, असा असून, यासाठ महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 10 वर्षांचा सामाजिक कार्य असावे, ज्या महिलांना दलितमित्र पुरस्कार किंवा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला आहे, त्या महिलांना हा जिल्हास्तरीय पुरस्कार अनुज्ञेय राहाणार नाही.

  इच्छुक महिला व संस्थाना विहीत नमुन्यातील अर्जासाठी तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सी., एस.नं.1608/09, प्लॉट नं.12 पहिला मजला, शोभा नगर, सात रस्ता, बिग बझार च्या पाठीमागे, सोलापूर दुरध्वनी क्रं.0217-2310671 येथे संपर्क साधावा व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह आपला प्रस्ताव 3 प्रतीत दिनांक 14  ऑगस्ट 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी काकटकर यांनी  केले आहे.