• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लिंगायत स्मशानभूमीच्या वादामध्ये समाजाच्या दोन्ही संस्था व समाजाला वेठीस धरू नये – विजयकुमार हत्तुरे

Yes News Marathi by Yes News Marathi
March 31, 2026
in इतर घडामोडी
0
लिंगायत स्मशानभूमीच्या वादामध्ये समाजाच्या दोन्ही संस्था व समाजाला वेठीस धरू नये – विजयकुमार हत्तुरे
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर -सोलापूर शहरातील लिंगायत समाजाच्या जिव्हाळ्याचा आणि अत्यंत संवेदनशील प्रश्न म्हणजे स्मशानभूमीचा प्रश्न आहे. अक्कलकोट रोड लगत असलेली जागा सोलापूर महानगरपालिकेने लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी देण्याचा प्रस्ताव महापालिकेत आणला होता. समाजाच्या दृष्टीने हा निर्णय स्वागतार्ह असला तरी, त्या स्मशानभूमीची देखभाल सिद्धेश्वर देवस्थान समितीकडे द्यावी की होटगी मठाकडे, यावरून अनावश्यक वाद आणि टीका सुरू झाली आहे.

या विषयामध्ये सध्या अतिशय घाणेरडे राजकारण होत असल्याचे दिसून येत आहे. काही मंडळी केवळ श्रेयवादासाठी आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी मंदिर समिती आणि मठ यांच्यामध्ये मुद्दाम वाद निर्माण करत आहेत. हा प्रकार समाजहिताला घातक असून, यामुळे संपूर्ण लिंगायत समाज बदनाम करण्याचे कटकारस्थान रचले जात असल्याची भावना समाजामध्ये निर्माण होत आहे.लिंगायत समाजाच्या भावना लक्षात घेता, सिद्धेश्वर मंदिर समिती आणि होटगी मठ या दोन्ही संस्था समाजाच्या श्रद्धेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे कोणत्याही एका संस्थेला लक्ष्य करून दुसऱ्या संस्थेविरोधात वातावरण निर्माण करणे चुकीचे आहे. समाजाच्या दोन्ही संस्थांमध्ये संघर्ष निर्माण करून संपूर्ण समाजाला वेठीस धरणे कोणालाही मान्य होणार नाही.

सोलापूर महानगरपालिकेने या प्रश्नाकडे सोलापूरच्या धर्तीवर सर्वसमावेशक धोरणात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. शहरातील सर्व स्मशानभूमी महापालिकेच्या अखत्यारीत घेऊन त्यांचे आधुनिकीकरण, स्वच्छता, पाणी, वीज, रस्ते, शेड, बसण्याची व्यवस्था, अंत्यविधीसाठी आवश्यक सुविधा अशा सर्व बाबींसह अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जागतिक लिंगायत महासभेची मागणी आहे.

लोकभावना समजून घेत सोलापूर महानगरपालिकेने तातडीने निर्णय घेतला तर यामुळे केवळ समाजाचा प्रश्न सुटणार नाही, तर सोलापूर शहराच्या विकासाला आणि सामाजिक सलोख्याला नवी दिशा मिळेल. श्रेय वादापेक्षा सामाजिक विकासाला प्राधान्य द्यावे असे मत यावेळेस राजेश काळे माजी उपमहापौर यांनी व्यक्त केले

सन २०२१ मध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये, तत्कालीन उपमहापौर राजेश काळे यांनी मजरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळील चौकास “लि. ष. ब्र. तनवीर शिवाचार्य महाराज विसावा चौक” असे नामकरण करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र त्या वेळी तत्कालीन सभागृह नेते शिवानंद पाटील तसेच तत्कालीन नगरसेवक वैभव हत्तुरे यांनी या प्रस्तावाला विरोध करून तो बारगळला होता.हा प्रस्ताव म्हणजे समाजाच्या भावना आणि होटगी मठाच्या सन्मानाशी निगडित असल्याने, संबंधितांनी समाजाची आणि होटगी मठाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
– विजयकुमार हत्तुरे
कार्याध्यक्ष, जागतिक लिंगायत महासभा
माजी परिवहन सभापती.

पत्रकार परिषदेस माजी उपमहापौर राजेश काळे, लिंगायत समाजाचे समन्वयक शकलेश बाबुळगावकर, सिद्धाराम कटारे, गणेश धोकटे हे उपस्थित होते.

Previous Post

TOP 25 । सोलापूर महापालिकेला नाहक सुमारे 100 कोटींचा भुर्दंड…!

Next Post

कवटीसारख्या चिन्हामुळे चर्चेत आलेला दुर्मिळ पतंग

Related Posts

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण
इतर घडामोडी

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026
अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा
इतर घडामोडी

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

August 12, 2026
अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!
इतर घडामोडी

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

August 12, 2026
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’
इतर घडामोडी

गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’

August 12, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
इतर घडामोडी

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026
लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक
इतर घडामोडी

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

August 11, 2026
Next Post
कवटीसारख्या चिन्हामुळे चर्चेत आलेला दुर्मिळ पतंग

कवटीसारख्या चिन्हामुळे चर्चेत आलेला दुर्मिळ पतंग

ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

August 12, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026