येस न्युज मराठी नेटवर्क : उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीचे सभापती रजनी भडकुंबे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे.चार सदस्यसंख्या असलेल्या पंचायत समितीच्या सभागृहात तीन सदस्यांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांकडे हा अविश्वास ठराव दाखल केला आहे. त्यामुळे भाजपचे इंद्रजित पवार आणि त्यांच्या सहकार्याने एक प्रकारे बदलाच घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अविश्वासाचा ठराव नोटीस वर उत्तर पंचायत समितीचे सभापती जितेंद्र उत्तम शीलवंत ,पंचायत समिती सदस्य हरिदास शिंदे आणि संध्याराणी इंद्रजीत पवार यांनी सह्या केल्या आहेत त्यामुळे उत्तर पंचायत समितीचे राजकारण ढवळून निघाले आहे