येस न्युज नेटवर्क : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकल्यानंतर खळबळ उडाली आहे. अशात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आमदारांना सूरतमध्ये मारहाण झाल्याचा आरोप केला होता. मात्र राऊत यांचा हा आरोप स्वत: एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांनी फेटाळून लावला आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, सगळेजण आनंदात आहेत, कुणालाही मारहाण, जबरदस्ती करण्यात आलेली नाही. आमदारांच्या मनात अनेक वर्षांपासून खदखद आहे, असं शिंदे यांनी म्हटलं.
आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलं की, आम्ही सर्वजण सोबत आहोत. आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर नाराजी आहे, असं ते म्हणाले. हे सर्व आमदार आहेत. त्यांना मारुन मुकटून कसं ठेवतील. आमदार छोटा माणूस नसतो की त्याला मारुन बसवू शकू. आम्ही आमच्या मर्जीनं आणि एकदिलानं इथं आहोतं. आमदार नितीन देशमुख यांची तब्येत व्यवस्थित आहे, असंही शिरसाट यांनी सांगितलं.