• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मेफेड्रॉन अंमली पदार्थ खरेदी–विक्री प्रकरणी अटकेतील आरोपीस जामीन मंजूर…

by Yes News Marathi
December 11, 2025
in इतर घडामोडी
0
मेफेड्रॉन अंमली पदार्थ खरेदी–विक्री प्रकरणी अटकेतील आरोपीस जामीन मंजूर…
0
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : मेफेड्रॉन या प्रतिबंधित अंमली पदार्थाच्या खरेदी–विक्री प्रकरणात जेल रोड पोलीस ठाण्यात दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी गु.र. क्र. 0500/2025 अन्वये नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोपी मेहमूद अब्दुल गनी शेख वय 50 वर्षे, रा. नित्यानंद नगर, साहू नगर, मुंबई यास सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाकडून 05 डिसेंबर 2025 रोजी सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.

पोलीसांच्या प्रथम खबरी अहवालानुसार, 28 सप्टेंबर 2025 रोजी जेल रोड पोलीस ठाण्याच्या पथकाने कर्णिक नगर क्रिडांगणाजवळील मोकळ्या मैदानात सापळा रचून कारवाई केली असता अमिर हमजा अखलाख दिना या इसमाच्या ताब्यातून 29 ग्रॅम मेफेड्रॉन , इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि चार प्लॅस्टिक पाऊच असा एकूण 72,800 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याची नोंद आहे. चौकशीत अमिर हमजाने सदर अंमली पदार्थ अटकेतील आरोपी मेहमूद अब्दुल गनी शेख याच्याकडून मिळवून सोलापूरात विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. या खुलास्यानंतर दोघांविरुद्ध NDPS कायद्याचे कलम 8(क), 22(ब) आणि 29 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.

मेहमूद अब्दुल गनी शेख यास 01 ऑक्टोबर 2025 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याने मे.जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर येथे आपला जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आरोपीतर्फे वकिलांनी असा युक्तिवाद केला की आरोपी निर्दोष असून त्याचा थेट सहभाग सिद्ध करणारा ठोस पुरावा उपलब्ध नाही. तपास पूर्ण झाला असून आरोपी पुराव्यावर परिणाम करणार नाही आणि त्याचा कोणताही गुन्हेगार पूर्वइतिहास नाही.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. योगेश अ. राणे यांनी 05 डिसेंबर 2025 रोजी आरोपी मेहमूद अब्दुल गनी शेख यास सशर्त जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी, ॲड. दत्तात्रेय कापुरे, ॲड. वैभव बोंगे, ॲड. ओंकार फडतरे, ॲड. रोहित थोरात, ॲड. मोहीम पठाण, ॲड. शिवरत्न वाघ, ॲड. मनिष बाबरे, ॲड. अभिषेक नागटिळक, ॲड. अजय वाघमारे आणि ॲड. त्वरिता वाघ यांनी कामकाज पाहिले

Previous Post

सोलापूरचा पाणी प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत…! खा. प्रणिती शिंदे संसदेत बोलणार

Next Post

एक दिवसाचे वेतन कापणार नाही; राज्यमंत्री भोयर यांचे आश्वासन…

Next Post
एक दिवसाचे वेतन कापणार नाही; राज्यमंत्री भोयर यांचे आश्वासन…

एक दिवसाचे वेतन कापणार नाही; राज्यमंत्री भोयर यांचे आश्वासन…

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In