• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पूज्य मुनीश्रींच्या पावन सान्निध्यात आध्यात्म, आरोग्य व संस्कारमूल्यांचा जागर

Yes News Marathi by Yes News Marathi
March 23, 2026
in इतर घडामोडी
0
पूज्य मुनीश्रींच्या पावन सान्निध्यात आध्यात्म, आरोग्य व संस्कारमूल्यांचा जागर
0
SHARES
1
VIEWS

संत शिरोमणी आचार्यश्री १०८ विद्यासागरजी महाराज महाराज शिष्य निर्यापक मुनीश्री १०८ वीरसागरजी महाराज श्रमीश्री मुनीश्री १०८ विशाल महाराज, मुनीश्री १०८ घवलसागरजी महाराज, मुनीश्री १०८ मंधनसागरजी महाराज, मुनी १०८ मननसागरजी महाराज, मुनी १०८ विरलसागरजी महाराज, मुनी १०८ विरलसागरजी महाराज, मुनी १०८ विरलसागरजी महाराज. सामाजिक व सामाजिक उपक्रमांची माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या पत्रकार परिषदेत श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर समितीचे अध्यक्ष श्री सुनील गाधी यांनी उपक्रमांचे सविस्तर विवेचन केले. यावेळी समितीचे इतर पदाधिकारी तसेच वालचंद शिक्षण समूहाचे विश्वस्त श्री पराग शहा उपस्थित होते.

अध्यात्म, आरोग्य आणि मानसिक संतुलनासाठी विशेष मेडिटेशन उपक्रम

सध्याच्या वेगवान, तणावपूर्ण आणि स्पर्धात्मक जीवनशैलीत वाढणारा स्ट्रेस, एन्जायटी आणि उच्च रक्तदाब (बी.पी.) या समस्या लक्षात घेता समाजाला मानसिक शांतता आणि आंतरिक स्थैर्य प्राप्त व्हावे, या उद्देशाने विशेष मेडिटेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दि. २४ मार्च २०२६, सकाळी ६:३० वाजता, गांधी नाथा जैन बोर्डिंग या उपक्रमामध्ये ध्यान, प्राणायाम, मनःशांती तंत्रे आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करण्यासाठी पूज्य मुनीश्रींकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन केले जाणार आहे. हा कार्यक्रम केवळ आरोग्यदायी जीवनासाठीच नव्हे, तर मानसिक तणावावर मात करून आत्मिक उन्नती साधण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव, ३० व ३१ मार्च

पूज्य मुनीश्रींच्या सान्निध्यात यंदा जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात तीन दिवस साजरी करण्यात येणार आहे. २९, ३० व ३१ मार्च २०२६ या तीन दिवसांत विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शुक्रवार पेठ येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर समोरील भगवान महावीर भवन विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८:३० पूज्य मुलीश्रींचे प्रवचन, दुपारी ३:३०- सखोल प्रवचन सत्र, सायंकाळी ६:१५ भक्ती आरती व शंका समाधान

या प्रवचनमालेतून अहिंसा, संयम, सत्य, त्याग, आणि आत्मशुद्धी या जैन तत्वज्ञानातील मूलभूत मूल्यांवर सखोल मार्गदर्शन केले जात असून, समाजातील प्रत्येक घटकाला सकारात्मक जीवनदृष्टी देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

वालचंद शिक्षण समूहासाठी विशेष द्विदिवसीय कार्यशाळा

मुनीश्रींनी आपल्या मनोगतात वालचंद शिक्षण समूहासाठी दोन दिवसीय विशेष कार्यशाळा आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला आहे. पहिला दिवस शिक्षकांसाठी, दुसरा दिवस – विद्यार्थ्यांसाठी

या कार्यशाळेचा मुख्य उद्देश केवळ शैक्षणिक प्रगतीपुरता मर्यादित नसून, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडवणे हा आहे. आजच्या तणावग्रस्त आणि स्पर्धात्मक वातावरणात विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेली अस्थिरता, एकाग्रतेचा अभाव, नैतिक मूल्यांतील घट आणि जबाबदारीची कमी जाण या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये पुढील गुण विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे :

स्वअनुशासन आणि आत्मनियंत्रण, कर्तव्यभावना आणि जबाबदारीची जाणीव, अभ्यासाविषयी सातत्य, निष्ठा आणि सकारात्मक दृष्टिकोन, नैतिक मूल्ये, संस्कार आणि सामाजिक जाणीव, शिक्षकांसाठी या कार्यशाळेत :

विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचे समज, मूल्याधारित शिक्षण पद्धती, प्रेरणादायी अध्यापन तंत्रे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन, यामुळे शिक्षण केवळ ज्ञानप्राप्तीपुरते मर्यादित न राहता संस्कारक्षम, जबाबदार आणि सजग नागरिक घडवण्याचे प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

नवकार इंटरनॅशनल दिवस – ९ मार्च

दि. ९ मार्च रोजी नवकार इंटरनॅशनल दिवस पूज्य मुलीश्रींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने सकल जैन समाज एकत्र येऊन सामूहिक नवकार मंत्र जप, प्रार्थना व विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करणार आहेत. यामुळे समाजात एकात्मता, श्रद्धा आणि अध्यात्मिक जागर निर्माण होईल.

समाजासाठी प्रेरणादायी संदेश

मुनीश्रींनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की, आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनात अध्यात्म, ध्यान आणि संस्कार यांची गरज पूर्वर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. व्यक्तीच्या अंतर्मनात शांती, समाधान आणि आत्मिक शक्ती निर्माण झाली तरच समाजात सुसंवाद, सहकार्य आणि एकात्मता प्रस्थापित होऊ शकते. या सर्व उपक्रमांना समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपले जीवन अधिक समृद्ध, संतुलित आणि संस्कारित करण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

सोलापूर मनपाच्या 2026-27 अंदाजपत्रकावर विभागनिहाय चर्चा सुरू; 23 ते 29 मार्चदरम्यान बैठकांचे वेळापत्रक जाहीर

Next Post

पश्चिम आशिया संघर्षावर पंतप्रधानांचे वक्तव्य पोकळ; शेतकरी, वीजटंचाई,महागाईवर मौन – खा.प्रणिती शिंदे

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
पश्चिम आशिया संघर्षावर पंतप्रधानांचे वक्तव्य पोकळ; शेतकरी, वीजटंचाई,महागाईवर मौन – खा.प्रणिती शिंदे

पश्चिम आशिया संघर्षावर पंतप्रधानांचे वक्तव्य पोकळ; शेतकरी, वीजटंचाई,महागाईवर मौन – खा.प्रणिती शिंदे

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026