• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आमदार राम सातपुते यांनी षटकार मारताच नागरिक म्हणाले ‘अबकी बार चारसो पार’

by Yes News Marathi
April 14, 2024
in इतर घडामोडी
0
आमदार राम सातपुते यांनी षटकार मारताच नागरिक म्हणाले ‘अबकी बार चारसो पार’
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार राम सातपुते यांनी दिली ‘जय मार्कंडेया’ ची घोषणा

सोलापूर : थेट जनतेत जाऊन लोकसंपर्कावर भर देणारे भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी रविवारी पूर्व भागातील मार्कंडेय उद्यान येथे मॉर्निंग वॉकवेळी नागरिकांशी संवाद साधला. यानंतर वल्याळ ग्राउंड येथे तरुणांसोबत क्रिकेट खेळताना आमदार राम सातपुते यांनी षटकार मारताच नागरिकांनी ‘अबकी बार चारसो पार’ च्या घोषणा दिल्या.

मार्कंडेय उद्यान येथे येताच तेथील नागरिकांनी आमदार राम सातपुते यांचे उत्स्फूर्त स्वागत करीत टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी आमदार राम सातपुते यांनी ‘जय मार्कंडेया’ अशी घोषणा देताच नागरिकांनीही ‘जय मार्कंडेया’ म्हणत त्यांना प्रतिसाद दिला. यावेळी महिला – भगिनी, ज्येष्ठ नागरिक यांनी आमदार राम सातपुते यांच्याशी संवाद साधत त्यांना सोलापूरकरांच्या अपेक्षा सांगितल्या. आगामी काळात सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित प्रयत्न करु असे अभिवचन आमदार राम सातपुते यांनी नागरिकांना दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर आणि सक्षम नेतृत्वावर आमचा विश्वास असून त्यांच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

यानंतर भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी वल्याळ ग्राउंड येथे तरुणांची संवाद साधला. क्रिकेट खेळण्यासाठी जमलेल्या तरुणांच्या आग्रहाखातर त्यांच्यासोबत क्रिकेट, हॉलीबॉल खेळून या तरुणांचा उत्साह आमदार राम सातपुते यांनी वाढवला. यावेळी आमदार राम सातपुते यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती. आमदार राम सातपुते मैदानात येताच शेकडो युवक त्यांच्याभोवती एकत्र होऊन ‘जय श्रीराम’, ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम,’ ‘अब की बार चारसो पार’ अशा घोषणा देत होते. ते शेताचे निर्णय खंबीरपणे घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच साथ देणार असल्याचे युवकांनी सांगितले.

Tags: 'Abki bar charso par'As soon as MLA Ram Satpute hit a sixMLARam Satpute
Previous Post

भाजप फक्त आश्वासन देणारी पार्टी, प्रणिती शिंदेंचा खोचक टोला

Next Post

सर्व शासकीय यंत्रणांनी 75 टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत- मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम

Next Post
सर्व शासकीय यंत्रणांनी 75 टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत- मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम

सर्व शासकीय यंत्रणांनी 75 टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत- मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group