गरबा उत्सवात आधार कार्ड तपासूनच प्रत्येकाला प्रवेश द्या

0
47

येस न्युज नेटवर्क : आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात यंदा मोठा उत्साह असणार आहे. कारण कोरोनामुळं गेले दोन वर्ष निर्बंध असलेला हा उत्सव यंदा निर्बंधमुक्त स्वरुपात होतोय. नवरात्रीमध्ये गरबा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या गरबा उत्सवासंदर्भात विश्व हिंदू परिषदेनं एक मागणी केली आहे गरबा हा श्रद्धेचा आणि उपासनेचा विषय असून सार्वजनिक इव्हेंट नाही, त्यामुळे गरबा आयोजनाच्या स्थळी फक्त हिंदू धर्मियांना प्रवेश द्याआणि त्यासाठी आधार कार्ड तपासा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने देशातील सर्व गरबा उत्सव आयोजन करणाऱ्यांना मंडळांना केली आहे.

गरबा उत्सवात श्रद्धा नसतानाही अनेक इतर धर्मीय प्रवेश घेतात आणि हिंदू महिला आणि तरुणींची छेड काढतात. पुढे लव्ह जिहाद सारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे आत्ताच काळजी घेतलेली बरी असा विश्व हिंदू परिषदेचा या मागणी मागचा तर्क आहे. यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेने विदर्भात अनेक ठिकाणी गरबा आयोजन करणाऱ्या मंडळांची भेट घेतली आहे, तर पोलीस अधिकाऱ्यांशी भेटणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत प्रमुख गोविंद शेंडे यांनी दिली आहे.