• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावरच ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास केला जाणार-पालकमंत्री गोरे

Yes News Marathi by Yes News Marathi
June 6, 2025
in इतर घडामोडी
0
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावरच ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास केला जाणार-पालकमंत्री गोरे
0
SHARES
0
VIEWS

ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपले गाव आपली जबाबदारी संकल्पना राबवली जाणार

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन हा एक प्रचंड अभिमानाचा व स्वातंत्र्याचा दिवस आहे. जागतिक स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारभाराचा अभ्यास केला जातो व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श व विचारावरच मार्गक्रमण करत आहे. तसेच ग्रामीण विकास विभागाच्या माध्यमातून गाव तिथे योजना व आपले गाव आपले जबाबदारी या माध्यमातून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राज्याभिषेक दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून स्वराज्याची गुढी उभारली, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महानगरपालिका आयुक्त डॉ.सचिन ओंबासे, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार गोरे पुढे म्हणाले की, 361 वर्षांपूर्वी म्हणजेच 6 जून 1674 रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. तो आजचा दिन आपल्यासाठी प्रचंड अभिमानाचा असल्याचे सांगून शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडविताना गड, किल्ले बांधले पण त्याचबरोबर लोकांची मने ही जिंकली. त्यांचे विचार स्वातंत्र्याचे आणि आत्मनिर्भरतेची दिशा दाखविणारे मार्ग आहेत. महाराजांचे विचार हे आपल्या महाराष्ट्र व देशापुरते नव्हते तर संपूर्ण मानव जातीसाठी आदर्श होते. त्यांचा आदर्श हा जगभर घेतला जातो, महाराजांच्या राज्याचा कारभार कशा पध्दतीने चालत होता त्या पध्दतीने राज्यकारभार आजही अनेक देश चालविण्याचा प्रयत्न करतात एवढे मोठे महात्मे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे असे त्यांनी सांगितले.

आपले राज्य शासन ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारावरच पुढे जात आहे. ग्रामविकास विभाग तसेच जिल्हा परिषद हे केवळ पायाभूत सुविधा किंवा योजना राबविणारी यंत्रणा नाही तर तो एक लोकसहभाग व लोकांच्या स्वातंत्र्याचा मार्ग दाखवणारा लोकशाहीचा पाळणा असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच गाव तिथे योजना, गाव तिथे प्रगती ही संकल्पना घेऊन पुढे जायचे आहे. सर्वांनी आपले गाव आपली जबाबदारी ही संकल्पना मनात ठेवुन आपण एकत्र येऊन गाव, तालुका, जिल्हा तसेच महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न करूयात असे आवाहन त्यांनी केले.

शिवगीतांचे केले पालकमंत्र्यांनी विशेष कौतुक…

याप्रसंगी मोहोळ येथील स्वानंद टीचर्स म्युझिकल ग्रुपच्या रुपेश क्षीरसागर, महेश कोटीवाले, एकनाथ कुंभार यांनी बहारदार सादर केलेल्या रायगड किल्ला, दैवत छत्रपती या शिवगीतांचे पालक मंत्री गोरे यांनी विशेष कौतुक करीत उपस्थितांना टाळ्या वाजवण्यास सांगितले…

त्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेमध्ये नुकतेच नूतनीकरण करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण सभागृहाचे तर नव्याने निर्माण करण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी मानले.ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जिल्हा परिषदे मध्ये आल्याबद्दल यांचा सत्कार संघटनेच्या वतीने अविनाश गोडसे, दिनेश बनसोडे, सुर्यकांत मोहिते, के पी शिंदे, संतोष जाधव अनिल पाटील यांनी केला व जिल्हा नियोजन समिती मार्फत छत्रपती शिवाजी उदयान जिल्हा परिषद ला सुशोभीकरणास निधी उपलब्ध करणेची मागणी केली. सुत्रसंचालन सचिन जाधव यांनी केले.

Previous Post

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विजापूर नाका पोलीस ठाण्यात १०१ झाडांची केली लागवड…

Next Post

जॉन डीअर इंडिया लिमिटेड, पुणे या नामांकित कंपनीमध्ये ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या 61 विद्यार्थ्यांची निवड…

Related Posts

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना
इतर घडामोडी

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
इतर घडामोडी

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
Next Post
जॉन डीअर इंडिया लिमिटेड, पुणे या नामांकित कंपनीमध्ये ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या 61 विद्यार्थ्यांची निवड…

जॉन डीअर इंडिया लिमिटेड, पुणे या नामांकित कंपनीमध्ये ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या 61 विद्यार्थ्यांची निवड…

ताज्या बातम्या

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026